"नारीशक्ती का हाथ.." आमदार श्वेता महाले यांच्या ट्विटची चर्चा..
X
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सरकारला आज विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांच्या निवडीला सामोरे जावे लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज एकनाथ शिंदे गट व भाजपचे सर्व आमदार हे काल मुंबई येथील ताज प्रेसिडेंट या हॉटेलमध्ये एकत्र आले आहेत. या ठिकाणी एकत्र आल्यानंतर चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहेत. या फोटोमध्ये श्वेता महाले यांच्यासोबत भाजपच्या इतरही महिला आमदार आहेत. त्यांनी हा फोटो शेअर करत म्हटला आहे की, ''विधानसभेत सर्वाधिक महिला आमदार आमच्या युतीचे आहेत अभिमान वाटतो मला माझ्या पक्षाचा आणि नेत्याचा'' असं म्हणत या सर्व महिला आमदारांनी मिळून राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या.
विधिमंडळात एकूण 24 महिला आमदार आहेत. त्यातील सर्वाधिक म्हणजेच 12 महिला आमदार या भाजप पक्षाच्या आहेत. त्यामुळे "नारीशक्ती का हाथ, भाजप-शिवसेना युती के साथ" असं म्हणत श्वेता महाले यांनी एक ट्विट केला आहे त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, नारी शक्ती का हाथ, भाजपा-शिवसेना युती के साथ...राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे जी व उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस जी यांची आज विधिमंडळातील माझ्या महिला सहकाऱ्यांसोबत भेट घेऊन या जोडगोळीला शुभेच्छा दिल्या. मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात ग्रामपंचायत ते संसदेपर्यंत महिलांना सर्वाधिक संधी भाजपाने दिली आहे. विधानसभेत सर्वाधिक महिला आमदार आमच्या युतीच्या आहेत. अभिमान वाटतो मला माझ्या पक्षाचा आणि नेत्याचा."
नारी शक्ती का हाथ, भाजपा-शिवसेना युती के साथ...
— Shweta Mahale Patil- श्वेता महाले पाटील . (@MLAShwetaMahale) July 3, 2022
राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री मा. @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांची आज विधिमंडळातील माझ्या महिला सहकाऱ्यांसोबत भेट घेऊन या जोडगोळीला शुभेच्छा दिल्या.
1/2 pic.twitter.com/p4I3acbap9