सुप्रिया सुळे यांना बसला धक्का
X
काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद गुरूवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले.खासदारांचे निलंबन, महागाईवर संसदेत चर्चा करण्याची मागणी, सोनिया गांधी यांची ईडी चौकशी या सगळ्या मुद्द्यांवरुन काँग्रेस खासदार गेल्या काही दिवसांपासून संसदेबाहेर आंदोलन करत आहेत. या आंदोलना दरम्यान एका न्यूज चॅनेलशी बोलताना अधीर रंजन चौधरी यांनी द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा केला. त्यामुळे दोन्हीही सभागृहात गदारोळ सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरुन संसदेचे कामकाज रोखून धरणाऱ्या काँग्रेसची अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्यामुळे कोंडी झाली आहे. दरम्यान यावर राष्ट्रवादी च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ही त्यांची प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हणालेत की.. आज लोकसभेत दुर्दैवी दृश्य पाहायला मिळाले. सभागृह तहकूब झाल्यानंतर सोनिया गांधी यांच्या विरोधात अनावश्यक घोषणा ऐकून धक्का बसला. आपण सर्वांनी सभागृहाची जबाबदारी घेतली पाहिजे आणि सभागृहाची प्रतिष्ठा आणि जपणूक केली पाहिजे. अशा पध्दतीच सुचक ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
सोनिया गांधी यांची प्रतिक्रिया़
दरम्यान एएनआय या वृत्तसंस्थेला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये अधीररंजन चौधरी यांनी आधीच आपल्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे, अशी माहिती दिली.