Home > Political > '' मुख्यमंत्र्यांच्या इशा-यावरून शिवसैनिकांचा किरीट सोमय्यांवर हल्ला'' - चित्रा वाघ

'' मुख्यमंत्र्यांच्या इशा-यावरून शिवसैनिकांचा किरीट सोमय्यांवर हल्ला'' - चित्रा वाघ

 मुख्यमंत्र्यांच्या  इशा-यावरून शिवसैनिकांचा किरीट सोमय्यांवर हल्ला - चित्रा वाघ
X

भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेतील संघर्ष टोकाला गेला आहे. त्यातच संजय राऊत यांच्या मित्रगटाचा 100 कोटींचा कोविड सेंटर घोटाळा असे ट्वीट सोमय्या यांनी केले होते. तर भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी सोमय्या पुणे शहरात दाखल झाले होते. त्यावेळी पुणे महापालिकेच्या आवारात शिवसैनिकांनी सोमय्यांवर हल्ला करत धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला. या सगळ्या प्रकारावरून भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ''जनतेसमोर शिवसेनेच्या भ्रष्टाचाराचं पितळ उघडं पाडणा-या किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांनी हल्ला केलाय इथं लोकशाही नव्हे ठोकशाही सुरू आहे.'' अशी संतप्त प्रतिक्रिया मॅक्सवुमनशी बोलताना दिली आहे.

किरीट सोमय्या पुणे महापालिकेच्या आवारात आपल्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला या प्रकारावरून चित्रा वाघ यांनी शिवसेनेसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाण साधला आहे.'' जनतेसमोर शिवसेनेच्या भ्रष्टाचाराचं पितळ उघडं पाडणा-या किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांनी हल्ला केलाय इथं लोकशाही नव्हे ठोकशाही सुरू आहे. मुख्यमंत्री तर शेतीतलं बुजगावणं बनून राहीलेत. माझी मागणी आहे,मुख्यमंत्र्यांच्या इशा-यावरून शिवसैनिकांनी हल्ला केलाय का याचा तपास व्हायला पाहीजे.'' असा आरोप करत त्यांनी चौकशीची मागणी केली आहे.

नक्की काय झालं होतं?

महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलाच संघर्ष रंगला आहे. त्यातच भाजप नेते किरीट सोमय्या दररोज महाविकास आघाडीच्या नेत्यांवर करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. त्यापार्श्वभुमीवर किरीट सोमय्या यांनी शनिवारी सकाळी संजय राऊत यांच्या मित्राने 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करत तक्रार दाखल करण्यासाठी पुणे शहरात गेले होते. दरम्यान पुणे महापालिकेच्या आवारात आपल्यावर हल्ला झाल्याची माहिती किरीट सोमय्यांनी दिली.

किरीट सोमय्यांनी शनिवारी सकाळी ट्वीट करून आरोप केला होता की, संजय राऊत यांचे मित्र सुजित पाटकर यांनी खोटी कागदपत्रे दाखवून जंबो कोविड सेंटरचे कंत्राट मिळवले. तसेच जंबो कोविड सेंटरमध्ये 100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. तर त्यासंबंधी तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या पुणे शहरात गेले होते. दरम्यान पुणे महापालिका आवारात आपल्यावर शिवसेनेच्या गुंडांकडून हल्ला झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.

Updated : 5 Feb 2022 9:08 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top