"जे घाबरले तेच भाजपमध्ये गेले" : प्रियंका चतुर्वेदी
X
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना EDने अटक केल्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर केले जाणार आहे. पण त्यांच्या या अटकेमागे राजकीय हेतू असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. तसेच आता राऊत यांच्य अटकेचा मुद्दा संसदेत देखील शिवसेनेतर्फे मांडला जाणार आहे. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी हाच मुद्दा राज्यसभेत मांडण्यासाठी नोटीस दिली आहे.
राज्यसभेतील सर्व कामकाज बाजूला ठेवून ED, CBI आणि आयकर विभाग या केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापरावर चर्चेची मागणी केली आहे. या केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून केंद्र सरकार आपला राजकीय अजेंडा राबवत आहे आणि विरोधकांना गप्प करण्यासाठी यंत्रणांचा वापर करत आहे, असा आरोप प्रियंका चतुर्वेदी यांनी केला आहे.
"संजय राऊत यांना ताब्यात घेण्यापुर्वी राज्यसभेच्या सभापतीला माहिती द्यायला हवी होती.यावर सभापतींनी कारवाई करायला हवी.जे घाबरले तेच भाजपमध्ये गेले जे ठामपणे उभे राहिले ते पक्षासोबत आहेत .पुढे हिच लोकं तुमच्या पाठीत खंजीर खुपसतील. जे पी नड्डा अहंकाराने बोलत आहे ते ठीक नाही . राजकारणात चढ उतार होत असतात"असे मत शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केले आहे.