Home > Political > भावना गवळी आज ई़डीच्या कार्यालयात हजर राहण्याची शक्याता

भावना गवळी आज ई़डीच्या कार्यालयात हजर राहण्याची शक्याता

भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये 17 कोटींच्या गैरव्यवहाराच्या आरोपानातर या प्रकरणी ईडीकडून तपास करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते हरिष सारडा यांनी भावना गवळी यांच्याविरोधात ही तक्रार दाखल केली होती. बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डने नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कोऑपरेशन कडून 43.35 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. यामध्ये भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये 17 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास केला जात आहे.

भावना गवळी आज ई़डीच्या कार्यालयात हजर राहण्याची शक्याता
X

यवतमाळ वाशिमच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये 17 कोटींच्या गैरव्यवहाराच्या आरोपानातर या प्रकरणी ईडीकडून तपास करण्यात येत आहे. ED ने त्यांच्या काही कार्यालयांवर छापे देखीत टाकले होते. सामाजिक कार्यकर्ते हरिष सारडा यांनी भावना गवळी यांच्याविरोधात ही तक्रार दाखल केली होती.

बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डने नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कोऑपरेशन कडून 43.35 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.Bhavana Gawali यांनी एनसीडीसीकडून कर्ज घेतले होते मात्र, ती कंपनी कधीच सुरु केली नव्हती असा दावा harish sagade यांनी केला. त्यानंतर आता ईडीने भावना गवळी खासदार गवळी यांना 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे भावना गवळी आज ई़डीच्या कार्यालयात हजर राहण्याची शक्याता आहे.

Updated : 4 Oct 2021 12:25 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top