बंडखोर शिंदेंची पक्षाच्या नेते पदावरून हकालपट्टी?
X
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर आता महाविकास आघाडी सरकारने बंडखोर आमदारांची कोंडी करायला सुरूवात केली आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड करून सरकारला आव्हान दिले आहे. त्यातच शिवसेनेकडून बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारने शिंदे गटाची कोंडी करण्यास सुरूवात केली आहे. त्यातच आज शिवसेनेच्या राष्ट्रय कार्यकारिणीची बैठक होणार असल्याचे म्हंटल जात आहे. या बैठकीला सर्व आमदार, खासदार व शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याचं म्हटलं जात आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देखील ऑनलाइन उपस्थित राहू शकतात असं म्हंटल जात आहे. या बैठकीत आज एकनाथ शिंदे यांना पक्षाच्या नेते पदावरून हकालपट्टी केली जाऊ शकते. आज या बैठकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडी सरकारने बंडखोर शिंदे गटाच्या आमदारांची सुरक्षा काढून घेण्यात आल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याच्या मागणीपाठोपाठ आता एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदारांची सुरक्षा काढून घेण्यात येत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. गेल्या अडीच वर्षात मविआतील घटक पक्षांकडून अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते व आताही शिवसेनेचे खच्चीकरण सुरू असल्याचा गंभीर आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे.#MVAisAntiShivsena pic.twitter.com/lX2qjVTxGM
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 25, 2022
एकनाथ शिंदे यांनी आमदारांचे संरक्षण काढले जात असल्याचा आरोप करतानाच या ट्वीटमध्ये आमदारांच्या सह्यांची यादी जोडली आहे.
गेल्या अडीच वर्षात मविआतील घटक पक्षांकडून अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते व आहे. pic.twitter.com/gUn4JEyIJq
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 25, 2022