Home > Political > आणि शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचा फोन केला कट..

आणि शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचा फोन केला कट..

पत्रकार परिषद चालू असताना उद्धव ठाकरे यांचा फोन शरद पवारांना आला आणि त्यांनी तो फोन कट केला असा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतो आहे. तर यावेळी नक्की काय घडलं होतं? शरद पवारांनी खरंच उद्धव ठाकरे यांचा फोन कट केला का? यावेळी नक्की काय घडलं होतं पहा..

आणि शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचा फोन केला कट..
X

एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून काल संध्याकाळी शपथ घेतली. मागच्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत बंड केले होते. या बंडा नंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती. मात्र एकनाथ शिंदे गुवाहाटी वरून काल गोव्याला आणि गोव्यावरून थेट ते मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्यपालांची भेट घेतली आणि त्यानंतर या दोघांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी भाजप शिंदे गटाला पाठिंबा देत असून एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील असं जाहीर केलं. मात्र पक्षश्रेष्ठींनी यात दखल घेत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद घेण्यास सांगितल्या नंतर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

या सर्व घडामोडी घडल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांना उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याशी तुमचं बोलणं झालं आहे का? असा प्रश्न केला आणि यावेळी शरद पवारांनी तुमच्याशी बोलत असतानाच त्यांचा फोन आल्याचं सांगितलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना आलेल्या फोनचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. अनेकांनी शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंचा फोन कट केला असं म्हणत हा व्हिडिओ शेअर केला आहे तर अनेक माध्यमांनी सुद्धा अशा बातम्या दिल्या आहेत.

पण यावेळी नक्की काय घडलं होतं? पवारांनी रागातून त्यांचा फोन कट केला का? तर झालं असं होतं की, शरद पवार पत्रकारांना संबोधित करत होते. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना शरद पवार उत्तर देत होते. यावेळी शरद पवार यांचा फोन अचानक वाजला. त्यानंतर त्यांनी तो फोन उचलला आणि त्यांनी मी सध्या पत्रकारांशी बोलतो आहे. मी तुम्हाला थोड्या वेळात फोन करतो असं सांगितलं. त्यावेळी कुणालाही नक्की कुणाचा फोन आला आहे हे काही समजलं नाही. त्यानंतर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना आत कुणाचाही फोन जोडू नका असं देखील सांगितलं. हे सगळं झालं आणि पत्रकारांनी त्यांना लगेच पुढचा प्रश्न विचारला तो प्रश्न असा होता की राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी तुमचं बोलणं झालं आहे का? यावेळी शरद पवार यांनी आत्ता तुमच्याशी बोलत असतानाचा उद्धव ठाकरे यांचाच फोन आला होता. आणि मी त्यांना नंतर फोन करतो असं सांगितल्याचं पत्रकारांना सांगितलं. हा सर्व प्रकार माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद होत होता. त्यानंतर थोड्याच वेळात समाजमाध्यमांवर शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचा फोन कट केला असा व्हिडिओ व्हायरल झाला. तर असा हा प्रकार शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत घडला होता. शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचा फोन रागाने किंवा द्वेषाने ठेवला नव्हता तर त्यांनी मी तुम्हाला नंतर फोन करतो असं सांगून तो फोन कट केला होता.

Updated : 1 July 2022 11:49 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top