Home > Political > "बाळासाहेबांच्या भोंगाची भूमिका पण प्रत्यक्षात उतरवा", शालिनी ठाकरेंचं शिवसेनेला आव्हान

"बाळासाहेबांच्या भोंगाची भूमिका पण प्रत्यक्षात उतरवा", शालिनी ठाकरेंचं शिवसेनेला आव्हान

बाळासाहेबांच्या भोंगाची भूमिका पण प्रत्यक्षात उतरवा, शालिनी ठाकरेंचं शिवसेनेला आव्हान
X

मनसे आणि शिवसेना हा संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची लक्षणं आता दिसू लागले आहेत. भोंग्यांच्या राजकारणातून मनसे आणि शिवसेना पुन्हा एकदा आमने सामने येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे यांचा भोंग्यांच्या विरोधातला व्हिडीओ टाकला होता. आता महिला अध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी ट्विट करून शिवसेनेला चेतवण्याचा प्रयत्न केला आहे.

शालिनी ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलंय, "जसे बाळासाहेबांचे वीडियो बनवून सभेची गर्दी वाढविण्याचा केविलवाणा प्रयत्न करता तसाच बाळासाहेबांच्या भोंगाची भूमिका पण प्रत्यक्षात उतरवा.....कळू दे की जनतेला एकदाचे तुमचे कडवे हिंदुत्व......!"

भुषण भिसे या वापरकर्त्याने शालिनी ठाकरे यांच्या ट्विटला समर्थन देताना, "निवडणूक आले की बाळासाहेब आठवतात.मुंबई मध्ये एक जागा मिळू शकत नाही यांना त्यांचे स्मारक बांधण्यासाठी." असं म्हटलं आहे.

अश्विन विधाते या वापरकर्त्याने तर एक वृत्तवाहिनीचा फोटो टाकला आहे ज्यात उत्तर प्रदेशातील राज ठाकरेंना विरोध करणारी लोकं दिसत आहेत. यात "बघा हिंदुत्व चे सोंग करून उत्तर प्रदेश मधे उतरलेले भोंगे पुन्हा चढतांना दिसत आहे. मागा माफी हिंदुत्व साठी, करा दर्शन श्री रामलल्ला चे कोणी रोखल (जय श्री राम)" असं म्हटलं आहे.

तर अमित घरत या वापरकर्त्याने शालिनी ठाकरे यांच्यावर टीका करताना, "साहेबांची सेना आहे म्हणून त्यांचे व्हिडीओ टाकणारच..तुमच्या सारख नाही आज याची तळी उद्या त्याची", असं म्हणत टीका केली आहे.

तर पंकज जाधव यांनी शालिनी टीका करताना, "जे वंदनीय बाळासाहेब असे म्हणु शकत नाही त्यांना त्यांचे नावही घेण्याचा नैतिक अधिकार नाही." असं म्हटलं आहे.

जय दादा सदावीलकर या वापरकर्त्याने टीका करताना, "लय शहाणी आहेस तू हिंदुत्व शिकवावं एवढी तुजी लायकी नाही" असं म्हणत टीका केली आहे.

राज ठाकरे असोत की राणा दांपत्य की भाजप सध्या सगळीकडे जातीभेदावर आधारीत राजकारण सुरू आहे. तसेच प्रक्षोभक ट्वीट्स, भाषणं होत आहेत त्यामुळे या सगळ्याला आपण किती बळी पडायचं हे आपण आपलं ठरवायचं आहे. आता या सगळयानंतर शिवसेना विरूध्द मनसे असा संघर्ष पाहायला मिळाला तर नवल वाटायला नको.

Updated : 10 May 2022 6:47 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top