सामनातुन भाजपच्या अंर्तगत वादात तेल
X
कोरोनाच्या संकटावर राज्याने मात केल्यानंतर कॉंग्रेस पक्षामध्ये मोठे राजकीय भुकंप होणार असल्याची भविष्यवाणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं आहे. यावर आज शिवसेनेनं आपल्या सामना या मुखपत्रातून भाजपवर बोचरी टीका केली आहे. भाजपमधील ज्येष्ठ आणि नाराज नेतेमंडळींकडे लक्ष वेधताना पंकजा मुंडे, विनोद तावडे, एकनाथ खडसे आणि चंद्रेशेखर बावनकुळे यांच्या तळमळ आणि तगमगीतून भुकंपाची वात पेटू नये म्हणून विरोधी पक्षाने सावध राहावे असा सल्लाही दिलाय.
हे ही वाचा..
- उमेदवारी नाकारल्याने पंकजा मुंडे नाराज, वाचा काय म्हणाल्या 'त्या' चार उमेदवारांना?
- ‘त्या’ पोलिस कन्येनं दिली पंकजा मुंडेंना नवी चेतना
- ‘चंद्रकांत दादांनी प्रॉमिस मोडलं’, पंकजा मुंडेंनंतर भाजपच्या ‘या’ महिला नेत्याही नाराज
भाजप नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांनी काही दिवसांपुर्वीच कॉंग्रेसमधून मला ऑफर आल्याचा गौप्यस्फोट करत भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर निशाणा साधला होता. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी एका मुलाखतीमधून त्यांच्या मुलगा आणि सुनेसाठी कापलेल्या इतर नेत्यांच्या संधीची आठवण करुन दिली होती. सोबतच कोरोनानंतर कॉंग्रेस पक्षात भुकंप होणार असल्याचं वक्तव्य केलं.
दुसरीकडे पंकजा मुंडे (Pankaja Munde) याही निराशेच्या गर्तेत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यामातून त्या आपल्या कार्यकर्त्य़ांना धीर धरण्याचा संदेश सतत देत आहेत. यावरुन त्यांचीही तळमळ स्पष्टपणे दिसून येते आहे. त्यामुळे भविष्यात या दोन नेत्यांकडून भाजपला काही धक्का बसू नये म्हणून चंद्रकांत पाटील यांचा काय प्लॅन आहे हे कोरोनाचं संकट टळल्यावरत कळेल.
काय म्हटलंय सामना अग्रलेखात,
‘महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षात लवकरच भूकंप होईल. राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल.’ चंद्रकांतदादा अशी काही उलथापालथ घडवू पाहत असतील तर तो त्यांचा राजकीय हक्क आहे. त्यासाठी त्यांनी पुन्हा एखादा लंगोट कसून मैदानात उतरायचा प्रयत्न जरूर करून पहावा. पाच महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस फोडून सरकार बनविण्याचा प्रयोग फसला. आता काँग्रेसमध्ये भूकंप घडवून महाराष्ट्रात उलथापालथ करायची असेल तर त्यांना कोण रोखणार? सर्व स्थिरस्थावर झाले की, पाटलांनी सरकार पाडण्यासाठी करवत, हातोडे, विळे, कोयते वगैरे घेऊन कामास लागावे.
105 चा भक्कम आकडा असतानाही त्यांना सत्ता राखता आली नाही. त्यांच्या जागी दुसरे कोणी असते तरी त्यांच्याही मनाची अशीच तळमळ व शरीराची लाहीलाही झाली असती. सध्या खडसे, सौ. पंकजा, बावनकुळे, तावडे अशा मंडळींचीही अस्वस्थ तगमग, तळमळ सुरूच आहे. त्या तगमगीतून एखाद्या नव्या भूकंपाची वात पेटू नये म्हणून विरोधी पक्षाने सावध राहायला हवे. राज्यात अस्थिरता नको व विरोधी पक्षही अस्थिर नको असे आमचे मत आहे.