Home > Political > गाडीभर पुरावे असून ईडी कारवाईत काही निष्पन्न नाही-रुपाली चाकणकर

गाडीभर पुरावे असून ईडी कारवाईत काही निष्पन्न नाही-रुपाली चाकणकर

गाडीभर पुरावे असून ईडी कारवाईत काही निष्पन्न नाही-रुपाली चाकणकर
X

राज्यातील अनेक राजकीय नेत्यांवर ED ची कारवाई झाली आहे .सध्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर आज सकाळ ED ने कारवाई केली आहे. ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या घरी दाखल झाले आहेत. त्यामुळे अनेक शिवसैनिकांसह राजकीय नेते ही संजय राऊत यांच्या समर्थनार्थ राजकीय नेत्यानी समाजमाध्यमांवर प्रतिक्रीया दिली आहे. यामुळे इडी (ED) आणि भाजपावर सडकून टीका होताना दिसत आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील माध्यमांना प्रतिक्रीया दिली आहे.

पत्रावाला चाळप्रकरणी राऊत यांच्याविरोधात सध्या ईडी कारवाई करत आहे. संजय राऊत यांनी "कोणत्याही घोटाळ्याशी माझा संबंध नाही आणि बाळासाहेबांची शपथ घेऊन मी सांगत आहे ,शिवसेनेसाठी नेहमी लढत राहीन "असं मत व्यक्त केलं होत. यावर अनेक राजकीय नेत्यांनी संजय राऊत याना समर्थन दिले आहे. अशाताच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील माध्यमांना प्रतिक्रीया दिली आहे त्या म्हणाल्यात की... ईडी कारवाई कोणावर होते आणि कोणावर होत नाही, हे सगळं महाराष्ट्र पाहत आहे. राजकारणात अनेक वेळा अशी विधाने केली गेली आहेत, अगदी गाडीभर पुरावे आणि गाडी कोणीच पोहचले नाही आहेत पण ईडी कारवाईत काही निष्पन्न झालं. हा एक विषय आहे माजी मंत्री. नवाब मलिक व माजी मंत्री. अनिल देशमुख यांच्यावर देखील कारवाई झाल्या यातून काय निष्पन्न झालं हे अजून समोर आलेले नाही. ईडीच्या कारवाईचा त्रास फक्त त्यांना नाही त्यांच्या कुटुंबियांवर परिणाम होतो. अशी प्रतिक्रीया चाकणकर यांनी दिली.

Updated : 31 July 2022 4:56 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top