‘आठवले म्हणुन पाठवले’ म्हणत रुपाली चाकणकरांचा दणका
X
जगभरातील कोरोना व्हायरसच्या दहशतीत रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे अध्यक्ष रामदास आठवले त्यांच्या ‘गो कोरोना, कोरोना गो’ या नाऱ्यामुळे चांगलेच चर्चेत आले होते. राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पुन्हा आठवलेंनी नवीन नारा देताना 'गो महाविकास आघाडी गो' असाही नारा दिल्याने राजकीय वादाला सुरुवात झाली.
यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी ‘केंद्रात गो गो म्हणून बघा कधी तुमचा खो-खो करतील हे तुम्हाला पण समजणार नाही’ असं म्हणत आठवलेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.
- आरोपींना फाशीची शिक्षा द्या : रुपाली चाकणकर
- ‘पळता भुई कमी होईल.. हिशोबात’, रुपाली चाकनकरांचा पलटवार
- पंकजा मुंडेंच्या व्यासपीठावर देवेंद्र फडणवीसांच्या हाती बूट, रुपाली चाकणकर म्हणतात
‘मध्य प्रदेशचा सत्तेचा व्हायरस लवकरच महाराष्ट्रात येईल आणि राज्यात भूकंप होईल’ असं भाकीत आठवले (Ramdas Athawale) यांनी केलं. ‘शरद पवार भूकंप होणार नाही असं म्हणत असले तरी भूकंप सांगून होत नसतात’ असा टोलाही आठवले यांनी पवारांना लगावला. ‘आता फक्त हा व्हायरस मध्यप्रदेशातून थेट महाराष्ट्रात येतो की राजस्थान मधून एंट्री करतो हे बघावं लागेल’ असं सूतोवाच आठवले यांनी केले.
आठवले यांच्या या भाकीतावर रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी “रामदास आठवले साहेब तुमच्या बोलण्याला महाराष्ट्रात तरी अर्थ नाही. केंद्रात गो गो म्हणून बघा कधी तुमचा खो-खो करतील हे तुम्हाला पण समजणार नाही. आठवले म्हणून पाठवले.” असं ट्वीट करत जोरदार टोला लगावला आहे.
मा.@RamdasAthawale साहेब तुमच्या बोलण्याला महाराष्ट्रात तरी अर्थ नाही.केंद्रात गो गो म्हणून बघा कधी तुमचा खो-खो करतील हे तुम्हाला पण समजणार नाही.
.
आठवले म्हणून पाठवले.@NCPspeaks @SpeaksMVAhttps://t.co/xwVfOy86S6
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) March 14, 2020