'हर्षवर्धन पाटील यांनी आपण भ्रष्ट आहोत हे स्वतःहूनच मान्य केलेलं आहे'; रूपाली चाकणकर यांची टीका
X
'भाजपमध्ये मी मस्त, निवांत आहे. शांत झोप लागते. आपल्यामागे चौकशी नाही, काही नाही...' या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी जोरदार निशाणा साधला आहे.भाजपमध्ये गेल्यामुळे चौकशी नाही हे सांगून हर्षवर्धन पाटील यांनी आपण भ्रष्ट आहोत हे स्वतःहूनच मान्य केलेलं आहे असं ट्विट चाकणकर यांनी केलं, सोबतच भाजपामुळे चौकशी नाही आणि महत्वाचं म्हणजे इंदापुरच्या जनतेने नाकारल्यामुळे तुम्हाला आमदारकी नाही. त्यामुळे आता निवांतच झोप लागणार. असा घणाघात त्यांनी केला.
भाजपमध्ये गेल्यामुळे चौकशी नाही हे सांगून हर्षवर्धन पाटील यांनी आपण भ्रष्ट आहोत हे स्वतःहूनच मान्य केलेलं आहे.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) October 13, 2021
भाजपामुळे चौकशी नाही आणि महत्वाचं म्हणजे इंदापुरच्या जनतेने नाकारल्यामुळे तुम्हाला आमदारकी नाही. त्यामुळे आता निवांतच झोप लागणार. https://t.co/r8W75fWF5z
सध्या भारतीय जनता पक्षामध्ये असलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मावळमधील (Maval) एका कार्यक्रमात 'भाजपमध्ये मी मस्त, निवांत आहे. शांत झोप लागते. आपल्यामागे चौकशी नाही, काही नाही...' हे वक्तव्य गंमतीनं केलेलं असलं तरी त्यामुळं उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्यावर चौफेर टीका होताना दिसत आहे.