चौथीतल्या चिमुकलीचा रोहित पवारांसोबत निरागस संवाद, तीने काय मागितलं एकदा ऐकाच..
X
‘रोहित पवारांना कोरोना घाबरतो’ हे कोणतही राजकीय व्यक्तव्य किंवा राजकीय व्यक्तीने मांडलेलं मत नाही. तर असा विश्वास एका चौथीतल्या मुलीनं व्यक्त केलाय. मृण्मयी म्हस्के असं या मुलीचं नाव असून तिने रोहित पवार (Rohit Pawar) यांना एक भावनिक पत्र लिहलं होतं. या भावनिक पत्राला साद देत रोहित पवार यांनी थेट मृण्मय़ीला फोन करुन तिच्याशी गप्पा मारल्या त्या दोघांमधील संवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
https://www.facebook.com/datta.borhade.18/videos/1348479952007921/?t=10
या पत्रात मृण्मयीने म्हटलंय की, “दादा तुम्ही जसा जामखेड मधून कोरोना घालवला तसा आष्टीमधून घालवाना. तिने वडिलांना विचारलं, पप्पा, प्रत्येकजण कुणाला तरी घाबरत असतो, तसा कोरोनापण कुणालातरी घाबरत असेलच ना? यावर तिच्या वडिलांनी कोरोना रोहितदादाला, डॉक्टरांना आणि पोलिसांना घाबरतो, असं उत्तर दिलं.” वाचा मृण्मयीचं संपुर्ण पत्र..