छोटा आदित्य हरला, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ
X
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात पिशोरी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव आणि जावई हर्षवर्धन जाधव नशिब आजमावत होते.
हर्षवर्धन जाधव यांचे कथित मारहाण प्रकरण, पत्नी संजना जाधव यांच्याशी त्यांचा सुरू असलेला कौटुंबिक वाद या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी एकमेकांविरुद्ध दिलेले पॅनल यामुळे कधी नव्हे ती पिशोर ग्रामपंचायतीची निवडणुक राज्यभरात चर्चिली गेली. विशेष म्हणजे हर्षवर्धन जाधव तुरुंगात असतांना त्यांच्या ८ उमेदवारांची जबाबदारी त्यांच्या १७ वर्षाच्या आदित्य या मुलाने घेतली होती. आई विरुध्द मुलाचे पॅनल असा रंग देखील याला दिला गेला.
हर्षवर्धन जाधव हे माजी आमदार सुद्धा राहिले आहे. परंतु, पिशोरी ग्रामस्थांनी संजना जाधव आणि हर्षवर्धन जाधव यांना नाकारले आहे. दोघांनाचाही दारुण पराभव झाला आहे.
17 पैकी हर्षवर्धन जाधव यांना 4 जागा तर संजना जाधव यांना मिळाल्या 2 जागा, तर महाविकास आघाडीने मिळवला 9 जागांवर विजय, तर दोन जागांवर अपक्ष उमेदवारांनी मिळवला विजय मिळवला आहे.