Home > Political > राणा Vs ठाकरे पोस्टर वॉर नक्की काय घडलं?

राणा Vs ठाकरे पोस्टर वॉर नक्की काय घडलं?

राणा Vs ठाकरे पोस्टर वॉर नक्की काय घडलं?
X

अमरावतीत ठाकरे vs राणा असे जोरदार पोस्टर वॉर रंगले होते. उद्धव ठाकरेंच्या अमरावती दौऱ्याआधी राणा दाम्पत्याकडून शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली होती. या बॅनरबाजी वरून वाद चिघळला आणि उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर फाडले. तर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी लावलेली बॅनर्स राणांच्या कार्यकर्त्यांकडून फाडण्यात आले आहेत.

उद्धव ठाकरे यांचा दोन दिवस विदर्भ दौरा काल सुरु झाला. पोहरादेवीचं दर्शन घेऊन त्यांनी दौऱ्याला सुरुवात केली. शिवसेनेचे नेते मंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेत त्यांनी राज्यात गद्दार आणि लाचारांचं सरकार असल्याचं वक्तव्य करत शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल केला. आमदार गेले तरी दमदार शिवसैनिक सोबत असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला...

Updated : 10 July 2023 8:19 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top