राज ठाकरेंनी शिवसेना का सोडली? राज ठाकरेंचा खुलासा
X
राज ठाकरे यांनी आज बाळासाहेबांचा विचार कॉंग्रेस,राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळे मोडीत निघाले असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ज्या कारणाने एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली त्याच कारणाने मी शिवसेना सोडली होती. शिवसेना संपण्यासाठी कुटूंबातील लोकच कारणीभूत आहेत. बाळासाहेबांच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेना बुडाली अशी सडकून टीका राज ठाकरे यांनी केली आहे.
आजारपणातून बरे झाल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे यांनी आजारपणातून बरे झाल्यानंतर प्रथमच झी 24 तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत थेट उध्दव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे. राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना बाळासाहेब ठाकरे असते तर एकनाथ शिंदे यांचे जे बंड झाले ते शक्यच नव्हते. त्यामुळे उगीच देवेंद्र फडणवीस यांना फुकटचं श्रेय देऊ नका. या सगळ्या गोष्टीचं श्रेय हे उध्दव ठाकरे यांनाच द्यावा लागेल, असंही राज ठाकरे म्हणाले.
तसंच राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, ज्या कारणामुळे मी शिवसेना सोडली त्याच कारणामुळे एकनाथ शिंदे यांनीही शिवसेना सोडली आहे. मात्र मी सगळी कारणं बाळासाहेब ठाकरे यांना सांगितली होती. त्यावेळी मी स्क्वाश खेळत होतो, असंही राज ठाकरे म्हणाले.
शिवसेनेच्या ऱ्हासाला कुटूंबातील लोकच कारणीभूत असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. तसेच उध्दव ठाकरे यांच्या आजूबाजूला वेगळे बडवे नसून हेच ते बडवे असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. तसेच त्यांचा पक्षातील वावर वाढल्यामुळेच मी बाहेर पडलो तर त्याच कारणामुळे आता एकनाथ शिंदे बाहेर पडल्याचा घणाघात राज ठाकरे यांनी केला.
राज ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीचा रोख उध्दव ठाकरे यांच्यावरच असल्याचे पुन्हा एकदा सिध्द केले. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, चांगल्या काळात पक्षात यायचं, सत्तेत बसायचं, संपत्ती गोळा करायची आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यंच्यावर खापर फोडायचं असंही टीकास्र राज ठाकरे यांनी सोडले.
उध्दव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे अपत्य असल्यानेच त्यांच्याकडे शिवसेना गेली. तसंच मी उध्दव ठाकरे यांना पक्षाचा कार्याध्यक्ष केल्याचा कुठलाही पश्चाताप झाला नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. मी शिवसेनेचा प्रमुख व्हावं अशी माझी इच्छा कधीच नव्हती, असं राज ठाकरे यांनी वक्तव्य केलं.
मी पक्ष सोडताना एकच प्रश्न विचारला होता. तो म्हणजे पक्षात माझा जॉब काय? मला बाळासाहेबांनी बोलावून घेतल्यानंतर मी म्हणालो की, काका तुझ्या मनात काय आहे? ते मला कळतंय. त्यावेळी बाळासाहेबांनी उध्दवला अध्यक्ष कर असं सांगितलं. त्यामुळं मी आत्ता जाहीर करतो की, बाळासाहेबांच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेना बुडाली, अशी सडकून टीका राज ठाकरे यांनी केली.