Home > Political > लोकशाहीसाठी रक्त सांडलं आहे माझ्या कुटुंबाने ,आम्ही घाबरणारे नाही आहोत ...

लोकशाहीसाठी रक्त सांडलं आहे माझ्या कुटुंबाने ,आम्ही घाबरणारे नाही आहोत ...

लोकशाहीसाठी रक्त सांडलं आहे माझ्या कुटुंबाने ,आम्ही घाबरणारे नाही आहोत ...
X

प्रियंका गांधी यांनी राहुल गांधींच्या प्रत्येक प्रयत्नात साथ दिली आहे. अनेकदा काँग्रेसला वेगवेगळ्या कारणांनी मागे खेचण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पण तरी सुद्धा राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा करत पुन्हा एकदा काँग्रेसला ताकद मिळवून दिली पण सध्या राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे .यावरूनच अनेक ठिकाणी आंदोलने होत आहेत . नुकतंच प्रियंका गांधी यांनी आपल्या आजीचा म्हणजेच इंदिरा गांधींचा व्हिडिओ शेअर करत एक नवा संदेश दिला आहे.

इंदिरा गांधींच्या या भाषणात नेमकं आहे काय?

"मला पर्वा नाही, मी जिवंत राहील किंवा मरून जाईल ... पण मला दीर्घायुष्य लाभलं आहे आणि या आयुष्याला गौरवायचं म्हंटल तर याच गोष्टीवर मी ठाम असेल की माझं संपूर्ण आयुष्य हे सेवेला समर्पित आहे आणि जोपर्यंत माझ्या श्वास चालू आहे तोपर्यंत उर्वरित आयुष्य सुद्धा जनतेच्या सेवेसाठी मी बहाल करेन आणि जर या सगळ्यात माझा प्राण गेलाच ,तर मी म्हणू शकते "रक्ताचा एक एक थेंब हा संपूर्ण भारताला पुन्हा जिवंत करेल आणि पुन्हा मजबुती देईल"

इंदिरा गांधींनी प्रमाणे प्रियांका गांधी सुद्धा धाडसी

प्रियंका गांधी यांनी आपल्या सोशल मीडियावर इंदिरा गांधींचा हा व्हिडिओ शेअर केला आहे . प्रियंका गांधी म्हणतात,"आम्ही कोणालाही घाबरत नाही आणि आम्हाला कोणीच घाबरवू शकत नाही .आम्ही पुन्हा धीट होत जात आहोत . लोकशाहीसाठी माझ्या कुटुंबातील सदस्यांना प्राण गमवावे लागले . ईडी किंवा वेगवेगळे प्रयोग करून आम्हाला धमकवण्याचा प्रयत्न करत असेल ,तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही . तर त्यांचं म्हणणं चुकीचं आहे आम्ही घाबरणाऱ्यांपैकी नाहीये आम्ही अजून पण कणखरपणे लढू"

गांधी परिवाराला राजकारण नवीन नाही,पण राजकारणामुळे झालेलं व्यक्तिगत नुकसान सुद्धा खूप आहे . तरीसुद्धा इंदिरा गांधी प्रमाणेच आपल्या परिवाराचा आणि आपल्या राजकीय विचारसरणीचा पुढाकार प्रियंका गांधी नेहमीच घेताना दिसतात.

Updated : 29 March 2023 7:40 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top