Home > Political > बिनकामाच्या गप्पा मारण्यापेक्षा लूट कधी बंद होईल ते आधी सांगा; प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

बिनकामाच्या गप्पा मारण्यापेक्षा लूट कधी बंद होईल ते आधी सांगा; प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

बिनकामाच्या गप्पा मारण्यापेक्षा लूट कधी बंद होईल ते आधी सांगा; प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
X

वाढत्या महागाईमुळे सर्वसामन्यांचे कंबरडे मोडले आहे. असं असताना पेट्रोल-डिझेल आणि घरघुती गॅस सिलेंडरमध्ये होणारी वाढ काही थांबायाला तयार नाही. याच मुद्यावरून कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी ( Priyanka Gandhi ) यांनी मोदी सरकारवर ( modi government ) हल्लाबोल केला आहे. ' इकडच्या-तिकडच्या गप्पा मारणे बंद करा आणि लूट कधी बंद होईल ते आधी सांगा.', असा टोला प्रियंका यांनी लगावला आहे. प्रियंका गांधी ( Priyanka Gandhi ) यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, " महागाईवर सरकारला थेट प्रश्न आहे. त्यांनी इकडच्या-तिकडच्या गप्पा मारणे बंद करून, जनतेची लूट कधी बंद होईल ते आधी सांगावे. स्वयंपाक घरातील बजेट, शेतातील लागत, वाहतूक खर्च वाढल्याने प्रत्येक घटक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे जोपर्यंत जनतेला दिलासा मिळत नाही, तोपर्यंत कॉंग्रेस रस्त्यावरील लढाई सुरूच ठेवणार," असा इशारा सुद्धा प्रियंका यांनी सरकारला दिला आहे.



वाढत्या महागाईच्या विरोधात कॉंग्रेसकडून देशभरात ठीक-ठिकाणी आंदोलन केले जात आहे. त्यासाठी कॉंग्रेसचे अनेक जेष्ठ नेते सुद्धा स्वत: आंदोलनात सहभाग नोंदवता असल्याचे सुद्धा पाहायला मिळाले. महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी महागाईच्या विरोधात कॉंग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे.

Updated : 14 July 2021 9:37 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top