Home > आदित्य ठाकरेंच्या दणक्यानंतर प्रियांका चतुर्वेदींचा केंद्र सरकाराला ‘हा’ सल्ला

आदित्य ठाकरेंच्या दणक्यानंतर प्रियांका चतुर्वेदींचा केंद्र सरकाराला ‘हा’ सल्ला

आदित्य ठाकरेंच्या दणक्यानंतर प्रियांका चतुर्वेदींचा केंद्र सरकाराला ‘हा’ सल्ला
X

कोरोना व्हायरस (Corona Virus) ला हरवण्यासाठी देशभरातील राज्य आणि केंद्र सरकार प्रयत्न करत आहेत. वारंवार नागरिकांना घरात राहण्याची सूचना देत आहे. पोलिसही नागरिकांनी घरात थांबावं म्हणून अनेक युक्त्या काढून गरज भासल्यास प्रसादही देत आहेत. मात्र, २१ दिवसांच्या लॉकडाऊन नंतर आता पुन्हा ३ मे पर्यंत या लॉकडाऊन (Lockdown 2) मध्ये वाढ करण्यात आल्यामुळे नागरिकांना बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागतं आहे.

हे ही वाचा...

लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या वर्गाचे हाल होत आहेत. लॉकडाऊन उठल्यानंतर भविष्यातही हाताला काम मिळेल याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत हे कामगार आपल्या कुटुंबांसह त्यांच्या प्रांतात जाण्यासाठी रेल्वेसेवा सुरु करण्याची मागणी करत आहेत. गुजरातमधील सुरतमध्येही असाच काहीसा प्रकार घडला होता.

या परिस्थितीत १४ एप्रिल म्हणजे कालपासून रेल्वे सुरू होणार असल्याची अफवा पसरल्यानंतर मुंबईच्या वांद्रे परिसरात (Bandra Crisis) दुपारी मोठी गर्दी उसळली. या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे. जमलेल्या लोकांना रेल्वे सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. सोबतच, रेल्वे प्रशासन आणि केंद्र सरकारमधील निर्णयप्रणालीतील समन्वयाचा अभावही या घटनेतून समोर आलाय.

या घटनेनंतर आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारला धारेवर धरताना मुंबई आणि सुरतमध्ये घडणाऱ्या घटनांना जबाबदार धरलं आहे. आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thackeray) वक्तव्याला प्रतिसाद देताना नागरिकांच्या चुकांवर पांघरुण घालताना शिवसेना (Shivsena) नेत्या प्रिय़ांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनीही केंद्र सरकारने या घटनांकडे मानवतावादी आणि सामाजिक दृष्टीकोनातून पाहावे अशी विनंती केली आहे.

“केंद्र सरकारला या गोष्टीची अवश्य जाणीव व्हायला हवी की, गेल्या तीन आठवड्यांपासून स्थलांतरीत कामगारांनी अधीरता आणि उद्युक्तपणा असातानाही मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं आहे. याशिवाय केंद्र सरकार प्रथम सुरत आणि आता मुंबईत घडलेल्या घटनेकडे आरोग्य आणि आर्थिक दृष्टीकोनातून पाहते आहे. कृपया या घटनेची मानवतावादी आणि सामाजिक बाजूही पाहा.”

दरम्यान, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई- सुरतमधील या घटनांचं खापर केंद सरकारवर फोडलं आहे. केंद्र सरकार या स्थलांतरीत मजुरांना आपल्या घरी पोहचवण्यासाठी कोणतीही वाहतुक सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेऊ शकलेलं नाही. परिणामी अशा घटना घडत आहेत. त्यांना या घडीला अन्न आणि निवारा नको असून आपल्या घरी पोहचायची तळमळ आहे. अशी भावना आपल्या ट्वीटर हॅडलवरुन व्यक्त केली आहे.

Updated : 15 April 2020 5:50 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top