निलेश राणेंविरोधात तृतीयपंथीयांना प्रकाश आंबेडकरांचा पाठींबा
X
भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे य़ांचे पुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांच्याविरोधात आक्षेपार्ह टीका करताना ‘हिजडा’ म्हणून संबोधल्यामुळे आता राजकीय वर्तुळात त्यांच्यावर टीकांचा वर्षाव होतो आहे. तृतीयपंथीयांकडून निलेश राणेंच्या वक्तव्याचा कडाडून विरोध केला जात आहे. तृतीयपंथीय सारंग पुणेकर (Sarang Punekar) यांनी त्यांना शब्द मागे घ्या नाहीतर योग्य ठिकाणी बाजार उठवला जाईल असा इशाराही दिलाय.
हे ही वाचा...
- ‘हिजडा शब्द मागे घ्या नाहीतर योग्य ठिकाणी बाजार उठवला जाईल’
- सोनिया गांधींवरील टीकेप्रकरणी अर्णब गोस्वामींना सुप्रीम कोर्टाचा दणका
- नवाजुद्दीन सिद्दीकीला पत्नीने पाठवली घटस्फोटाची नोटीस, पाहा कोण आहे त्याची पत्नी?
तृतीयपंथीय़ांच्या बाजूने आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे देखील उभे राहिले आहेत. ‘गुंडगिरी प्रवृत्तीचे लोकं जेव्हा राजकारणात येतात तेव्हा त्यांना सामाजिक भान राहत नाही.’ अशी कडवी टीका करत प्रकाश आंबेडकर यांनी आपला पाठींबा दर्शवला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय की,
“गुंडगिरी प्रवृत्तीचे लोकं जेव्हा राजकारणात येतात तेव्हा त्यांना सामाजिक भान राहत नाही. माणूस म्हणून कोणालाही हिनवण्याचा अधिकार नाहीये. तृतीयपंथीदेखील माणूस आहेत, त्यांना स्वीकारले पाहिजे. हे भान राजकारण्यांना असावे. ऐरवी निलेश राणेची दखल घेण्याची गरज नाही. पण, त्यांनी जो शब्द वापरला आहे तो मागे घ्यावा आणि समस्त समाजाची माफी मागावी. निलेश राणेच्या वक्तव्याचा जाहीर निषेध! आम्ही तृतीयपंथी समूहाच्या बाजूने उभे आहोत!”