महाविकास आघाडीच्या बाजूने जनतेचा कौल - डॉ. मीनल खतगावकर
X
काल दिनांक २४ ऑक्टोबर रोजी काँग्रेस पक्षाची पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. आता महायुतीच्या तीनही घटक पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीतून ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. यानंतर काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण ४८ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. काँग्रेसच्या या यादीत काही ठिकाणी विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.महाविकास आघाडीच्या बाजूने जनतेचा कौल - डॉ. मीनल खतगावकर
दरम्यान, कॉंग्रेस पक्षाने नायगाव उमरी धर्माबाद विधानसभा मतदारसंघातून डॉ. मीनल खतगावकर यांना उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डॉ. मीनल खतगावकर यांनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीच्या नेत्यांचे मानले आभार आहे. डॉ. मीनल खतगावकर म्हणाल्या की, महाविकास आघाडीने मला उमेदवारी देऊन माझ्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. ही निवडणूक आम्ही सर्व तयारीनिशी लढू आणि जिंकू, असा विश्वास आहे. राष्ट्रीय नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, गटनेते बाळासाहेब थोरात आणि इतर सर्व नेत्यांचे मार्गदर्शन आहे. महाविकास आघाडीच्या बाजूने जनतेचा कौल आहे. आणि नायगाव मतदारसंघामधून निश्चितच महाविकास आघाडीचा उमेदवार हा मोठ्या बहुमताने निवडून येईल, असा विश्वास डॉ. मीनल खतगावकर यांनी व्यक्त केला आहे.