Home > Political > Narendra Modi ; "कॅमेरासोबत घट्ट नाते असलेला माणूस.." नरेंद्र मोदींवर लोक संतापले

Narendra Modi ; "कॅमेरासोबत घट्ट नाते असलेला माणूस.." नरेंद्र मोदींवर लोक संतापले

Narendra Modi ; कॅमेरासोबत घट्ट नाते असलेला माणूस.. नरेंद्र मोदींवर लोक संतापले
X

भाजपने राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मोर्मू यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे एक आदिवासी महिलेचा प्रथमच देशाच्या सर्वोच्च पदावर बसणार असल्याची चर्चा आहे. द्रौपदी मोर्मू यांचा उमेदवारी अर्ज काल नरेंद्र मोदी व राजनातज सिंह यांच्या उपस्थितीत भरण्यात आला. हा अर्ज भरताना जे घडलं त्यामुळे नरेंद्र मोदी यंच्यावर जोरदार टीका होत आहे. तर झालं असं की, उमेदवार असलेल्या महिलेचा अर्ज त्याच उमेदवार महिलेने निवडणूक अधिकाऱ्याकडे देणे अपेक्षित असतं. पण फक्त कॅमेऱ्यासोबत घट्ट नाते ठेवण्यासाठी दुसऱ्याचा उमेदवारी अर्ज हा स्वत: अधिकाऱ्याकडे देत असलेला नरेंद्र मोदी यांचा फोटो समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरलं होतं आहे. त्यांच्या या फोटोवरून लोक टीका करत आहेत.

या छायाचित्राचे निट निरिक्षण केल्यास असे दिसते कि, नरेंद्र मोदी यांनी निवडणूक अर्ज हातात घेत तो निवडणूक अधिकाऱ्यांकडे देत आहेत. यावेळी उमेदवार असलेल्या द्रौपदी मोर्मू या त्यांच्या बाजूला उभ्या आहेत. आता फोटोसाठी दुसऱ्याचा अर्ज सुद्धा स्वतः निवडणूक अधिकाऱ्यांकडे देणाऱ्या नरेंद्र मोदी समाजमाध्यमांवर ट्रोल होत आहेत. त्यांच्यावर टीका देखील केली जात आहे.




या सर्वांची जी पितृसंघटना आहे तिच्यामधे स्त्रियांना कायमच दुय्यम ठेवण्याचे शिकविलेले आहे. ते अनेकदा उघड झालेलेही आहे. या छायाचित्रातही अगदी तसेच आहे. एका आदिवासी महिलेला विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या राज्यघटनेनूसार राष्ट्रपती करावीच लागत आहे पण तिचे सर्व सुत्र आपल्याचकडे कसे रहातील याची कि फक्त झलक आहे असं म्हणत या फोटोवरून नरेंद्र मोदी व आरएसएस वर टीका होताना पाहायला मिळतं आहे.

द्रौपदी मोर्मू कोण आहेत?

द्रौपदी मोर्मू ह्यांनी शिक्षिका म्हणून कामाची सुरुवात केली होती. पण त्यानंतर त्यांनी राजकारणात भाग घेतला. ओडिशामध्ये त्यांनी आमदार म्हणून काम केले आहे. तसेच त्या काही कालावधीसाठी मंत्री होत्या. २०१५ ते २०२१ या काळात त्यांनी झारखंडच्या राज्यपाल म्हणून काम केले आहे. भाजपकडील बहुमताचा आकडा पाहता द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जातो आहे.

Updated : 27 Jun 2022 9:49 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top