"एक गेला तर लाख बनवू" ममतांची गयारामांना तंबी
X
पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांची ममता यांनी बैठक घेतली होती. यामध्ये त्यांनी असा एक नेता गेला तर त्याच्यासारखो लाख नेते आपण बनवू शकते, असे म्हटले होते.
ममता यांनी शुक्रवारी पक्षाच्या कोणत्याही नेत्याचे नाव न घेता जे लोक पक्ष विरोधी कारवाया करत आहेत, विरोधी पक्षाच्या संपर्कात आहेत ते पक्ष सोडण्यासाठी स्वतंत्र आहेत, असे म्हटले आहे. ममता यांनी नाव घेतले नसले तरीही त्यांचा हा इशारा नाराज असलेले नेते शुभेंदू अधिकारी आणि पक्षाच्या विरोधात बोलणारे काही नेते, आमदार यांच्यासाठी होता.
या बैठकीदरम्यान ममता बॅनर्जी यांनी उत्तर भारतात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे म्हटले. तसेच टीएमसीच्या शेतकऱी संघटनांनी ८ डिसेंबर रोजी कृषी कायद्यांविरोधात मध्य कोलाकातातील महात्मा गांधी यांच्या प्रतीमेसमोर तीन दिवसीय आंदोलन करण्याचे निर्देशही त्यांनी दिली.