पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचे पुन्हा बिनसले..?
X
मागच्या महिनाभरापासून रखडलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडला. आज राजभवन येथे भाजपच्या नऊ तर शिंदे गटाच्या नऊ आमदारांनी शपथ घेतली. हा शपथविधी पार पडण्याआधी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या नेत्यांसोबत स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. यावेळी या आयोजित स्नेहभोजनास पंकजा मुंडे कुठेही दिसल्या नाहीत. त्याचबरोबर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात भाजपकडून पक्षातील नेत्यांना फोन केले असल्याची माहिती देखील समोर आली आहे. यावेळी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना मात्र कोणाचाही फोन गेला नसल्याचं देखील समोर आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली आहे.
मागच्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे स्वपक्षातीलच काही नेत्यांवर नाराज असल्याची चर्चा सुरू होते. त्याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे, पंकजा मुंडे यांचा विधान परिषद निवडणुकीत डावलण्यात आले. त्यानंतर बीडमध्ये उघड उघड पंकजा मुंडे समर्थकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी नाराजी व्यक्त केली. अनेक मुंडे समर्थकांनी भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निदर्शने देखील केली. त्यानंतर एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला या शपथविधीला स्वतः पंकजा मुंडे हजर होत्या. त्यामुळे पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची नाराजी दूर झाली असल्याचे म्हंटले जात होते. त्याचबरोबर मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात पंकजा मुंडे यांना प्रामुख्याने स्थान दिलं जाईल असं देखील म्हटलं जात होतं. मात्र आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात पंकजा मुंडे यांना पुन्हा डावडण्यात आले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात पुन्हा एकदा नाराजी निर्माण झाली असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे.