भाजप आमदारांच्या निलंबनावर पंकजा मुंडे यांची 'नो कमेंट'
X
ओबीसी आरक्षणाचा प्रस्ताव विधानसभेत मांडत असताना, विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे भाजपच्या 12 आमदारांच एक वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे. यावरून भाजप महत्वाचे नेते आणि आमदारांनी महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली आहे. मात्र असं असताना भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी चुप्पी साधली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाचा प्रस्ताव मांडताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत ओबीसी आरक्षण रद्द होण्यासाठी भाजप जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला. छगन भुजबळ यांनी भाजपवर केलेल्या आरोपांमुळे विरोधी बाकांवरील सर्व सदस्यांनी गोंधळ घातला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या कॅबन मध्ये सुद्धा भाजप आमदारांनी राड घातला, त्यामुळे 12 भाजप आमदारांच निलंबन करण्यात आलं.
भाजप आमदारांच्या निलंबनानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांपासून तर केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सर्वांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. पण अशावेळी भाजपच्या महत्वाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी एक वळीच ट्विट सुद्धा केलं नाही. त्यामुळे भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा यानिमित्ताने पुन्हा पहायला मिळत आहे.