Home > Political > पंकजा मुंडे, सुप्रिया सुळेंनी महिला मुख्यमंत्री व्हावे': तृप्ती देसाई

पंकजा मुंडे, सुप्रिया सुळेंनी महिला मुख्यमंत्री व्हावे': तृप्ती देसाई

पंकजा मुंडे, सुप्रिया सुळेंनी महिला मुख्यमंत्री व्हावे: तृप्ती देसाई
X

अमरावती जिल्ह्यातील सर्वच महत्वाच्या पदावर महिला असल्याने, जिल्ह्यातील विकासाची दोरी महिलांच्या हातात असल्याचं पाहायला मिळत आहे. यावर प्रतिक्रिया देतांना,' आता राज्याचे मुख्यमंत्री पद सुद्धा एकदा महिलेकडे जावे आणि त्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे किंवा राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे सक्षम असल्याचं भूमाता ब्रिगेडच्या पप्रमुख तृप्ती देसाई यांनी म्हंटलं आहे.

तृप्ती देसाई यांनी फेसबुक पोस्ट करत म्हंटलं आहे की," महिलाराज महाराष्ट्रात आले पाहिजे हे वारंवार आम्ही म्हणत असतो. आज अमरावतीत हे "महिलाराज" पाहायलाही मिळाले.पण अजूनही महाराष्ट्रामध्ये महिला मुख्यमंत्री झाली नाही हे दुर्दैवच आहे. परंतु आता काही महिला नेत्या आहेत ज्या मुख्यमंत्रिपद चांगल्या प्रमाणात सांभाळू शकतात.

माझ्या मते भाजपची सत्ता आली तर पंकजा मुंडे या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हाव्यात आणि महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादीची सत्ता आल्यास सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री व्हाव्यात, सध्यातरी या दोघीच या पदासाठी मला सक्षम वाटतात,असं देसाई म्हणाल्यात.


Updated : 17 July 2021 8:10 AM IST
Next Story
Share it
Top