पंकजा मुंडेंची मोठी घोषणा, कोरोनाचं संकट टळल्यावर करणार ‘हे’ मोठं काम
X
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त (Gopinath Munde Death Anniversary) आज गोपीनाथ गडावर खासदार प्रितम मुंडे (Pritam Munde) यांनी अभिवादन केलं. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी लॉकडाऊनमुळे पोलिसांनी केलेल्या विनंतीला मान देऊन गोपीनाथगडावर जाणं टाळंलं आणि मुंबईत त्यांनी राहत्या घरी गोपीनाथ मुंडेंच्या प्रतिमेचं पुजन केलं.
यानिमित्ताने त्यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून गोपिनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. कोरोनाचं संकट टळल्यानंतर पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्र दौरा करणार असल्याची मोठी घोषणा आज केली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्या घरातून बाहेर पडत नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
हे ही वाचा...
- १२ तासात 'निसर्ग' अधिक घातक होण्याची शक्यता
- कोणत्याही प्रवासीचा मृत्यू भुकेने न झाल्याचा पीयुष गोयल यांचा दावा
- ‘शिवाजी महाराजांच्या नावावर अवैध धंदे’, तृप्ती देसाईंनी दाखवले पुरावे
“मी पराभवाने निराश होणारी नाही. मुंडे साहेबांचं रक्त माझ्या अंगात आहे. मुंडे साहेबांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. आज माझ्या समर्थकांसमोर फार मोठा प्रश्न आहे. की पंकजाताई आता काय करतील? ताईंना राजकारणात काय स्थान आहे? पंकजाताईंच राजकारणात स्थान काय? त्या आम्हाला भेटतील का? असे प्रश्न जनतेच्या मनात आहेत, मात्र राजकारणात स्थान आहे की नाही याचा कसलाच विचार करणार नाही. मी आजिबात निराश नाही, खचलेली नाही, खचून जाणारं माझं रक्त नाही तुम्हीही खचायचं नाही. आपण पुन्हा नव्याने सुरुवात करु.” असं आवाहनही त्यांनी लाईव्हच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना केलं. पाहा व्हिडीओ..
https://www.facebook.com/PankajaGopinathMunde/videos/733686934069756/?t=1