Home > Political > मतदानांदरम्यान पंकजा मुंडेंना वडिलांची अर्थात जेष्ठ नेते ' गोपिनाथ मुंडेंची' आठवण येते

मतदानांदरम्यान पंकजा मुंडेंना वडिलांची अर्थात जेष्ठ नेते ' गोपिनाथ मुंडेंची' आठवण येते

मतदानांदरम्यान पंकजा मुंडेंना वडिलांची अर्थात जेष्ठ नेते  गोपिनाथ मुंडेंची आठवण येते
X

महाराष्ट्रात आज चौथ्या टप्प्याचे मतदान होत आहे. ज्यामध्ये बीडसह राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तर बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेद्वार पंकजा मुंडे यांनी परळीतील नाथरा गावात मतदान केले. यावेळी यांनी आपले स्वर्गीयवासी वडील गोपिनाथ मुंडे यांची आठवण काढली. तर महाराष्ट्र सरकारच्या माजी मंत्री पंकजा मुंडे मतदानापूर्वी म्हणाल्या आजचा दिवस खुप महत्वाचा आहे.

तसेच मी लोकांना अवाहन करु इच्छीते की बाहेर या आणि मतदान करा... मला माझे वडिल गोपिनाथ मुंडे यांची आठवण येते पण गेल्या काही वर्षांपासून मला वाटते त्यांची ताकद व त्यांचा आशिर्वाद माझ्यासोबत आहे. तसेच ते म्हणाले ' मला विश्वास आहे की आम्ही ४०० जागांचा टप्पा पार करु. तसेच जेव्हा पंतप्रधान मोदींनी ४०० पार करण्याचा नारा दिला तेव्हा मला वाटते की आपण ते पार करु... तर देश आपले मत अत्यंत समजदारीने देणार आहे.

बीडमध्ये मुंडे यांची राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनावणे यांच्या विरोधात लढत आहे. तसेच पंकजा मुंडे या भाजपाचे जेष्ठ नेते स्वर्गीयवासी गोपिनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते आणि शिंदे सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे हे त्यांचे चुलत भाऊ आहेत.

Updated : 13 May 2024 10:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top