Home > Political > पंकजा मुंडे अचानक दिल्लीला रवाना; राजकीयदृष्ट्या मोठी घडामोड

पंकजा मुंडे अचानक दिल्लीला रवाना; राजकीयदृष्ट्या मोठी घडामोड

पंकजा मुंडे अचानक दिल्लीला रवाना; राजकीयदृष्ट्या मोठी घडामोड
X

केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने अनेक मुंडे समर्थकांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली असतानाच, पंकजा मुंडे अचानक दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे.

कालपर्यंत पंकजा मुंडे काय निर्णय घेणार अशी चर्चा सुरु असताच, आता पंकजा यांची दिल्ली वारी राजकीयदृष्ट्या मोठी घडामोड समजली जात आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात डॉ. प्रितम मुंडे यांना मंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता अधिक होती. विशेष म्हणजे त्याचं नावही चर्चेत होते. मात्र, अचानक डॉ. भगवानराव कराड यांचं नाव आल्यानं मुंडे समर्थकांमध्ये मोठा राग आहे. त्यामुळे अनेक समर्थक आपला संताप सोशल मिडियावरून मांडत आहे.

राज्याच्या राजकारणात मुंडे परिवाराला डावलण्यात येत असल्याचं आरोप सुद्धा होत आहे. त्यामुळे अनेक मुंडे समर्थकांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली होती. पंकजा मुंडे नाराज आहेत. असं बोललं जात असताना पंकजा यांनी पत्रकार परिषद घेत आपण नाराज नसल्याचं सांगितलं होतं. मात्र, आज पंकजा मुंडे दिल्लीला रवाना झाल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

Updated : 11 July 2021 11:15 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top