"पूजा चव्हाण ही माझ्या मतदारसंघातील तरुणी, तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे"
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पंकजा मुंडे यांची चौकशीची मागणी
X
पुण्यामध्ये पूजा चव्हाण नावाच्या 23 वर्षांच्या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एका मंत्र्यांचा संबंध असल्याचा आरोप झाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. दरम्यान भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी ट्विट करत ही मागणी केली आहे, "पूजा चव्हाण ही माझ्या मतदारसंघातील तरूणीचा मृत्यू ही बातमी अतिशय धक्कादायक आहे. हया तरूणीच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे" अशी मागणी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली आहे.
रविवारी रात्री पुण्यातील वानवडी भागात पूजा चव्हाण यांनी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली, असे सांगितले जात आहे. पण यासंदर्भात अनेक तर्क वितर्क लावले जात असून तिच्या आत्महत्येमागे महाविकास आघाडीतील एका मंत्र्याचा हात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या महिलेचे सदर मंत्र्यांसोबत सार्वजनिक कार्यक्रमातील फोटो व्हायरल झाले आहेत.
पूजा चव्हाण ही माझ्या मतदारसंघातील तरूणीचा मृत्यू ही बातमी अतिशय धक्कादायक आहे. हया तरूणीच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे ..@CMOMaharashtra@AnilDeshmukhNCP @DGPMaharashtra
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) February 11, 2021
एकीकडे हे फोटो व्हायरल झाले असताना या महिलेचे भाजपच्या नेत्यांसोबत देखील फोटो असल्याचं दिसून येत आहे. मूळची बीड जिल्ह्यातील परभणीची असलेली पूजा तिच्या मित्रासोबत वानवडी भागात फ्लॅटमध्ये राहत होती. रविवारी रात्री मित्रांसोबत तिने पार्टी केली आणि त्यानंतर तिने इमारतीवरून उडी मारली, असे सांगितले जात आहे.
भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने पुणे पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करावी, असं निवेदन देखील देण्यात आलंय.या आरोपांमुले या आत्महत्या प्रकरणाचं गुढ अधिकच वाढत गेल्याचं दिसून येत आहे.