सरकार पडणार की नाही...; स्वपक्षातील नेत्यांना पंकजा मुंडेंचा घरचा आहेर....
X
पंकजाताई नुसती घरात बसते अस म्हणार्यांनी माझा दौरा पहावा, मी आता उसाच्या फडात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. मी नाशिक, मुंबई, दिल्लीचा दौरा करणार आहे. तुम्हा सर्वांची काळजी वाटते म्हणून दौरा केला नाही. ज्या वेळी लोकांना औषध मिळत नव्हते त्या वेळी मी दौरा कारण योग्य होते का? कोरोनाच्या काळात घरोघरी आम्ही लोकांना जेवण पोहोचलं. कोरोनाच्या काळात दौरा नाही पण आम्ही लोकांना जेवण पोहोचलं. आज देखील हा मेळावा होणार की नाही असं सर्वांना वाटत होतं. सत्तेत नाही मेळावा नको असं देखील मला अनेकांनी सांगितले पण लोकांना ऊर्जा देण्यासाठी मेळाव्याची गरज असल्याचं पंकजा मुंडे यांनी आज सावरगाव येथील भगवानगडावर आयोजित दसरा मेळाव्यात सांगितलं. आज हजारोंच्या संख्येने मुंडे समर्थक व ऊसतोड मजूर कामगार यांच्या उपस्थित दसरा मेळावा पार पडला. खरतर कालच पंकजा मुंडे यांनी मला तुमच्याशी बोलायचं आहे असं सांगितलं होतं. त्यामुळे आज दसरा मेळाव्यात त्या काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी, राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून महिलांवर बलात्कार, अत्याचार होत आहेत.जर कोणी महिलेकडे वाकडी नजर करून पाहिलं तर डोळे काढून घेणाऱ्यांची ही भूमी आहे. असे कृत्य करणाऱ्याला हत्तीच्या पायाखाली दिले पाहिजे. राज्यात जे काही चालू आहे त्यावर बोलायचं नाही का? सरकारला जाब विचारायचा की नाही? असे प्रश्न देखील यावेळी पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला.
सद्या रोज सरकार पडणार असे जे म्हणत आहेत त्यांना देखील पंकजा मुंडे यांनी घरचा आहेर दिला. प्रत्येक नेता उठतो आणि आज सरकार पडणार उद्या सरकार पडणार अस म्हणतं आहे व सत्ताधारी आमचं सरकार खंबीर आहे असं सांगत आहेत. तर सरकार पडणं किंवा ते खंबीर असंन हे आपल ध्येय नाही. सरकार पडणार की नाही यातून तुम्ही बाहेर पडणार आहेत की नाही? असा खोचक सवाल देखील त्यांनी त्यांच्याच पक्ष्यातील लोकांना लगावला.
पंकजा मुंडे यांनी यावेळी तांबकुचे व्यसन न करण्याचे देखील आवाहन केले. त्यांनी यावेळी कोणत्याही प्रकारचे हारतुरे स्वीकारले नाहीत व त्यांनी फेटा देखील बांधून घेतला नव्हता कारण OBC आरक्षण मिळेपर्यंत फेटा व मराठा आरक्षण मिळेप्रर्यंत हातरुरे स्वीकारणार नाही असं जाहीर केले होते.