पंतप्रधान मोदिंच्या पाकिस्तानी बहिणीचा संशयास्पद मृत्यु
X
देशाचे पतप्रधान नरेंद्र मोदिंना भाऊ मानणाऱ्या पाकिस्तानी कार्यकर्त्या करीमा बलोच यांचा संशयास्पद मृत्यु झाल्याने चर्चा सुरु झाल्या आहेत. कॅनडाच्या शरणार्थी असलेल्या बलोच यांचे नाव 2016 मध्ये जगातील सर्वात प्रभावशाली 100 महिलांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते. करीमा बलोच यांचा मृतदेह कॅनडामध्ये सापडला.
करीमा बलोच यांनी एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण भाऊ मानत असल्याचं म्हटलं होतं. बलुचिस्तानातील सर्वच महिलांच्या नजरा मोदींकडे लागून राहिल्या आहेत, असंही त्या म्हणाल्या होत्या. त्या बलुचिस्तानातील विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा होत्या. मोदींना भाऊ संबोधून त्यांनी आंतरराष्ट्रीय फोरममध्ये मानवाधिकार उल्लंघनाविरोधात आवाज उठवण्यास सांगितलं होतं.
रक्षाबंधनला ट्विटरवर राखी शेअर करत करीमा बलोच यांनी मोदींकडे मागणी केली होती. बलुचिस्तानातील बेपत्ता बहीण-भावांचा शोध घ्या, पाकिस्तानाविरोधात मी जागतिक स्तरावर आवाज उचलणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला होता.