लोकसंख्या नियंत्रण कायद्यावरून नितीशकुमार-रेणू देवी आमने-सामने
X
नवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने लोकसंख्या नियंत्रणासाठी नवीन कायदा लागू केल्यानंतर, देशभरात हा चर्चेचा विषय बनला आहे. तर बिहारमध्ये लोकसंख्या नियंत्रणाबाबतच्या कायद्यावरून मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री रेणू देवी आमने-सामने आले असल्याचे पाहायला मिळत आहेत. दोघांनी यावरून एकमेकांचे कान टोचले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकसंख्या नियंत्रणाबाबत घेतलेल्या निर्णयावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांना विचारले असता ते म्हणाले होते की, केवळ कायदे करून लोकसंख्या नियंत्रित करणे शक्य नाही. यासाठी महिलांनी शिक्षित होणे अधिक महत्वाचे आहे, असं म्हणाले.
नितीश कुमार यांच्या विधानावर उपमुख्यमंत्री रेणू देवी ह्या प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी पुरुषांनी जागरूक होण्याची आवश्यकता आहे. लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी पुरुषांमध्ये नसबंदी करण्याविषयी देखील भीती असल्याचं सुद्धा त्या म्हणाल्यात.