'ही अनिश्चितता माझ्यासाठी फार मोठी चिंतेची बाब..' इंधन दरवाढीबाबत निर्मला सीतारमन यांनी व्यक्त केली चिंता
X
'ज्या प्रमाणात इंधन वाढ होत आहे हे एक मोठे आव्हान माझ्यासमोर आहे. आमची अर्थ विभागाची टीम याकडे अभ्यासपूर्ण पद्धतीने पाहत असून, ही अनिश्चितता माझ्यासाठी फार मोठी चिंतेची बाब' आल्याचे केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.
सध्या ज्याप्रमाणे इंधन वाढ सुरू आहे त्याचा त्रास सर्वसामान्यांना होत आहे. इंधन वाढीमुळे अनेक जण संकटात सापडले आहेत. इंधन दरवाढीमुळे सर्वांचेच आर्थिक गणित बिघडले आहे. सध्या पेट्रोलचे दर पाहिले तर विमानातील पेट्रोलच्या दरापेक्षाही वाहनांमधील पेट्रोलच्या किमती अधिक पाहायला मिळत आहेत.
ह्या पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती बद्दल निर्मला सीतारमन यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. कोरोना कळात देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. त्यामधून सध्या भारतीय अर्थव्यवस्था सावरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी आपल्यापुढे अनेक आव्हाने देखील आहेत. जागतिक बाजारपेठेत वस्तूंचे भाव वाढले असून इंधनाचे भाव देखील वाढत आहेत. ते एक मोठं आव्हान असून या इंधन दरवाढीचा परिणाम देशातील महागाई वाढण्यासाठी होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या खर्च करण्यावर देखील मर्यादा येत असल्याचे निर्मला सीतारमन यांनी सांगितले.
आज पेट्रोल डिझेलचे भाव काय आहेत.
महाराष्ट्राचा विचार केला तर आज मुंबई या ठिकाणी पेट्रोलचे प्रति लिटर भाव 111.77 रुपये आहे तर डिझेल प्रति लिटर 102.52 रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. तर दिल्लीमध्ये आज पेट्रोलचे दर 105 रुपये प्रति लिटर व डिझेल 94 रुपये प्रति लिटर आहे. मागील दीड वर्षांपासून सर्व जगावर कोरोनाचे सावट आहे. संपूर्ण जग या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहे. भारतातही कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातलं होतं. या काळात अनेक रोजगार, उद्योगधंदे बंद पडले. अशा परिस्थितीत सध्या ज्या प्रकारे इंधन दरवाढ होत आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. अनेक लोक आर्थिक विवंचनेत आहेत.