निर्भया प्रकरण: आरोपींची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव
X
निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांड (Nirbhaya Rape Case) प्रकरणातील चार पैंकी तीन दोषींनी फाशी टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे धाव घेतलीय. या दोषींमध्ये अक्षय, पवन आणि विनय यांनी आंतरराष्ट्रीय कोर्टाकडे ( International Court of Justice) पत्र लिहून फाशी टाळण्याची विनंती केलीय.
संबंधित बातम्या..
- निर्भया प्रकरणात बलात्काऱ्यांना कोण वाचवतंय? सरकार, न्यायालय की आणखी कोणी?
- निर्भया बलात्कार प्रकरण: दोषींची फाशी तिसऱ्यांदा टळली
- किती काळ आम्हाला न्यायासाठी वाट बघावी लागणार? निर्भयाच्या आईचा सवाल
दोषींचे वकील ए पी सिंह यांच्या म्हणण्यानुसार, फाशीच्या शिक्षेविरोधात जगभरात वेगवेगळ्या संघटनांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेत. २० मार्च रोजी सकाळी ५.३० वाजता दोषींना फाशी होणार आहे यापूर्वी त्यांनी हा शेवटचा मार्ग अवलंबला आहे.
मुकेश सिंह याने आपल्या जुन्या वकीलाने फसवणुक केल्याचा आरोप करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ती याचिका फेटळली आहे. दरम्यान आज आरोपींच्या कुंटुंबीयांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहत इच्छा मरणाची मागणी केल्यामुळे या प्रकरणाने आता नवीन वळण घेतले आहे.