नीलम गोऱ्हे संतापल्या म्हणाल्या "झाडावरची बांडगुळ... "
X
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी काल सकाळपासून ईडीची चौकशी सुरू होती. काल संध्याकाळी उशीरा पर्यंत ईडी कार्यालयाने राऊत यांना ताब्यात घेतले. असंख्य शिवसैनिकांनी भाडूंप येथील त्यांच्या घराबाहेत गर्दी केली होती. या केंद्रीय यंत्रणे ED विरोधात त्यांना विविध ठिकाणावरून पाठींबा दर्शवला जात आहे. तर भाजपावर देशभरात मोठ्या संख्येने टीका होत आहे. त्यांच्या या कारवाईविरोधात शिवसेनेकडून आंदोलने होत आहे. अशातच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी संजय राऊत यांना समाजमाध्यंमावर समर्थन देत आहेत. यावर विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेचे उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी काल संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले. यावर रात्री उशीरा संजय राऊत यांना अटक करण्यात आली. खासदार संजय राऊत यांच्या अटकेबाबत नीलम गोऱ्हे यांना विचारल असता त्या म्हणाल्या की.. कुठल्याही व्यक्ती बाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना म्हणजेच तपास सुरू असताना मत व्यक्त करणे योग्य नाही. पण एक गोष्ट आहे की खासदार संजय राऊत यांनी जी मुदत मागितली होती ती मुदत देण्यात आली नाही. अनेक वर्ष याचा तपास सुरू आहे. संजय राऊत हे सामाजिक काम तसेच पत्रकारांच्या समस्येवर काम करत असून ते याही परिस्थितीवर योग्य प्रकारे ते आपली बाजू मांडतील. ज्यांनी मृत साहित्यकांची मुंडकी कापली आहे आणि सांस्कृतिक अतिक्रमण केलं आहे. अश्या प्रकारचे लोक जेव्हा बोलायला लागतात.तेव्हा त्यांना अश्या पद्धतीने बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. एखाद्या झाडावर जसे बांडगुळं असतात तसे या घटनेवर काही लोक बोलत आहे. अशी टीका यावेळी गोऱ्हे यांनी केली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या बाबत अजूनही प्रतिक्रिया दिली नाही अस नीलम गोऱ्हे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की.. याबाबत उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आणि न्यायालयीन तपास सुरू असताना अश्या पद्धतीने प्रतिक्रिया देणे योग्य नाही. मला एक वाटत आहे की ईडी ,सीबीआय अश्या संस्थाचा जर कालमर्यादेत निकाल लागला तर लोकांनाही कळेल अस देखील यावेळी गोऱ्हे म्हणाले. पुरावे असतील तर जरुर टिका करावी. न्यायालयीन प्रक्रिये मध्ये बांडगुळं प्रवृत्तीचा उच्छाद होऊ नये. ही माझी अपेक्षा आहे. अशा पध्दतीची टिका नीलम गोऱ्हे यांनी भाजपावर केली आहे.