शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांचा विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल
X
शिवसेना उपनेत्या डॉ. निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी आज विधानपरिषदेच्या निवडणूकीसाठी (MLC Election) अर्ज दाखल केला आहे. शिवसेना पक्षाकडून दोन जागांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासह निलम गोऱ्हे यांचं नाव घोषित करण्यात आलं होत. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होत आहे. काँग्रेसने २ उमेदवार जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीत तणावपुर्ण वातावरण निर्माण झालं होतं. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्तीनंतर काँग्रेसने आपला एक उमेदवार मागे घेतला आणि ही निवडणूक आता बिनविरोध होत आहे.
निवडणूक होत असलेल्या ९ जागांपैकी महाविकास आघाडीनं ५, तर भाजपानं ४ जणांना उमेदवार दिले आहेत.
शिवसेना
- उद्धव ठाकरे
- निलम गोऱ्हे
राष्ट्रवादी
- शशिकांत शिंदे
- अमोल मिटकरी
कॉंग्रेस
- राजेश राठोड
भाजप
- रणजितसिंह मोहिते पाटील
- गोपीचंद पडळकर
- प्रविण दटके
- डॉ. अजित गोपछेडे