"पुन्हा असे बिनकामी धंदे न करण्याची सदबुद्धी मिळो", रूपाली पाटील यांची राणा दांपत्यासाठी प्रार्थना
X
गेल्या महिन्याभरापासून राज्यामध्ये राणा दाम्पत्य चर्चेत आहे. मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याची घोषणा असूदेत वा त्यावरुन चिडलेल्या शिवसैनिक यांनी राणा दाम्पत्याच्या मुंबईतल्या घराला घातलेला घेराव असू दे. या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्याला अटक केली होती. या अटकेमध्ये पण नवनीत राणांसोबत पोलिसांनी दुर्व्यवहार केल्याचे आरोप झाले. या अटकेच्या तब्बल बारा दिवसांनंतर रवी राणा आणि नवनीत राणा पती-पत्नीला जामीन मिळाला. त्यानंतर दोघही एकमेकांना भेटले. त्या दोघांचा ही एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओत नवनीत राणा रवी राणा यांना भेटताना रडत आहेत असं दिसतंय. या व्हिडिओचेच फोटो पोस्ट करत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्या म्हणतात, "जेलवारी वाईटच ,प्रचंड त्रास होतोच,आणि मानसिक खच्चीकरण सुद्धा
हा हसण्याचा किंवा चेष्टेचा विषय नाही
माझ्यावर राजकारणात 22 ते 25 केसेस घेऊन ,काम केले
प्रचंड त्रास होतो
फरक एवढाच
आम्ही लोकांसाठी ,लोकांना सुविधा मिळण्यासाठी आंदोलने केली
आणि राणा दांपत्य यांनी लोकांना,समाजाला विनाकारण वेठीस धरले म्हणून जेल मध्ये
असो लवकर बरे व्हा,
आई जगदंबा तुम्हाला लवकर बरे करो,आणि पुन्हा असे बिनकामे धंदे न करण्याची सदबुद्धी मिळो."