‘खाल्ल्या मिठाला तरी जागा’ रुपाली चाकणकरांचा योगींना आक्रमक टोला
X
स्थलांतरीत मजूरांवरुन महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश मधील राजकीय वातावरण आता चांगलंच तापताना दिसत आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) यांनी महाराष्ट्रात उत्तर प्रदेशातून मजूर बोलवायचे असतील, तर त्यासाठी उत्तरप्रदेश सरकारची परवानगी घ्यावी लागेल असा निर्णय जाहीर केला आहे.
यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ‘योगी आदित्यनाथ जी महाराष्ट्र हा अवघ्या देशातील नागरिकांना कधीही सहारा देतो’ असं सांगताना ‘खाल्ल्या मिठाला तरी जागा’ अशी घणाघाती टीका केली आहे.
हे ही वाचा...
- ‘४० पेक्षा अधिक ट्रेन रस्ता चुकल्या त्यावर रेल्वेमंत्री काहीच बोलले नाहीत?’
- युपीत १० लाख कोरोनाबाधित आहेत का? प्रियांका गांधींचा योगींना सवाल
- महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार?
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कामगारांसाठी मायग्रेशन कमिशन स्थापन करण्याची घोषणा केली आहे. यामुळे इतर राज्यांना उत्तर प्रदेशातून मजूर बोलवायचे असतील, तर त्यासाठी उत्तरप्रदेश सरकारची परवानगी घ्यावी लागेल.
“योगी आदित्यनाथ जी महाराष्ट्र हा अवघ्या देशातील नागरिकांना कधीही सहारा देतो, हाताला काम देतो, उपाशी लोकांना कष्ट केलं तर भाकर देतो. मात्र तुमचं अपयश आमच्या राज्यावर लोटून मोकळे होण्याचा प्रयत्न करून नका."खाल्ल्या मिठाला तरी जागा"आणि होय नागरिकांची,त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या.. !”
योगी आदित्यनाथ जी महाराष्ट्र हा अवघ्या देशातील नागरिकांना कधीही सहारा देतो,हाताला काम देतो,उपाशी लोकांना कष्ट केलं तर भाकर देतो.मात्र तुमचं अपयश आमच्या राज्यावर लोटून मोकळे होण्याचा प्रयत्न करून नका."खाल्ल्या मिठाला तरी जागा"आणि होय नागरिकांची,त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या.. !
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 25, 2020
दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अजब मागणीनंतर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही या प्रकरणात उडी घेतली. “कामगारांसाठी उत्तर प्रदेशची परवानगी घ्यायची असेल तर मग महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही,” अशी भूमिका मांडली आहे. राज ठाकरेंच्या या भुमीकेमुळे मजूरांच्या परतीच्या वाटेत आता अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- हे ही वाचा...