आंग सांग स्यू की यांच्या मदतीला व्हाइट हाऊस
व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या जेन पास्की म्यानमार लष्कराशी करणार चर्चा
X
म्यानमारमध्ये पुन्हा एकदा राजकीय संघर्ष पेटला आहे. लष्कराने उठाव करत सत्ता काबीज केली आहे. स्टेट काउंसलर आंग सान सू की यांना नजरकैद करण्यात आले आहे, अशी माहिती समोर आली आहे. आंग सान सू की आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
"निवडणुकांमधील घोटाळ्यां"मुळे लष्कराने नेत्यांना ताब्यात घेतले आहे असे लष्कराने म्हटले असून, लष्करप्रमुख मिन आँग हलेंग यांच्या हाती सत्ता सोपवण्यात आली आहे व देशात एक वर्षासाठी आणीबाणी जाहीर करण्यात आल्याचे म्यानमार लष्कराच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं. लष्कराच्या मालकीच्या एका टीव्ही स्टेशनद्वारे ही माहिती देण्यात आली.
दरम्यान, म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षा स्यू की यांच्या मदतीला अमेरिकेने पुढाकार घेतला असून व्हाईट हाऊसच्या प्रवक्ता जेन पास्की म्हणाल्या की, अमेरिका या घटनेमुळे चिंतीत आहे. म्यानमारने देशातील लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार ताब्यात घेतले आहे आणि आँग सान स्यू की यांना अटक केली आहे.
अमेरिका स्थितीवर लक्ष ठेवून आहे. आम्ही म्यानमारच्या लोकांसोबत आहोत. आम्ही म्यानमारच्या लोकतांत्रिक संस्थेला आणि सरकारला आपले समर्थन देत आहोत. आमच्याकडून त्यांना मदत केली जाईल. आम्ही तेथील लष्कराला आग्रह करतो की त्यांनी लोकतांत्रिक पद्धतीचे पालन करावे आणि कायद्याचे राज्य चालू द्यावे. ताब्यात घेण्यात आलेल्या नेत्यांना सोडून द्यावे, असं जेन पास्की म्हणाल्या आहेत.