Home > ‘त्या’ व्हिडीओचा संबंध मशिदीशी जोडल्यामुळे अर्णब विरोधात गुन्हा दाखल

‘त्या’ व्हिडीओचा संबंध मशिदीशी जोडल्यामुळे अर्णब विरोधात गुन्हा दाखल

‘त्या’ व्हिडीओचा संबंध मशिदीशी जोडल्यामुळे अर्णब विरोधात गुन्हा दाखल
X

मुंबई पोलिसांनी रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक आणि मालक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्या विरोधात पायधुनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुस्लीम समुदायाविरोधात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यामुळे त्यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या...

यापुर्वी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करण्यावरुन देशभरातून १०० हून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. त्यानंतर अर्णब यांनी त्यांच्यावर आणि पत्नीवर दोन कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची तक्रार दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाकडून ३ आठवडे कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश देण्यात आले होते. शनिवारी पुन्हा अर्णब विरोधात गुन्हा दाखल झालाय.

नळ बाजार येथील रहिवासी इरफान अबुबकर शेख यांनी अर्णब यांच्याविरोधात ही तक्रार दाखल केलीय. त्यांनी तक्रारीत म्हटलंय की, “अर्णब आणि त्यांच्या चॅनलने मुस्लिम समुदायाविरोधात समाजात जाणिवपुर्वक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. त्यांनी बांद्रा येथील १४ एप्रिल रोजी हजारोंच्या संख्येने जमा झालेल्या परप्रांतिय स्थलांतरीत कामगारांचा संबंध बांद्रामधील मशिदीशी काहीही संबंध नसताना जाणिवपुर्वक जोडला.”

यासाठी रिपब्लिक भारत चॅनलने बांद्रा स्थानकाजवळील स्थलांतरीत कामगारांच्या जमावाचा व्हिडीओ २९ एप्रिल रोजी कार्यक्रमात वापरला होता. अर्णब स्वत: त्यात एंकरींग करत होते.

शेख यांनी अर्णब यांच्या शो मधील मुस्लिम समुदायाविरोधात द्वेष पसरवणाऱ्या काही वाक्यांचा संदर्भ या तक्रारीत दिलाय. “अब से थोडी देर पहले बांद्रा मे जामा मस्जिद है और इस जामा मस्जिद के पास अचानक हजारो लोगो की भीड जमा हो गई|मुंबई के बांद्रा में मस्जिद क पास किसने भीड जूटाई ”

पायधूनी पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरु असल्याचं म्हटलं आहे. तर संबंधित कार्यक्रमाचे फुटेज पुरावा म्हणून तक्रारदारांनी दिले आहेत.

Updated : 4 May 2020 8:47 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top