Home > Political > "आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर झटकून ठाकरे सरकार पळ काढतंय"

"आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर झटकून ठाकरे सरकार पळ काढतंय"

खासदार रक्षा खडसे यांचा ठाकरे सरकारवर आरोप

आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर झटकून ठाकरे सरकार पळ काढतंय
X

स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गेल्याने, आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपकडून आज राज्यभरात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. जळगाव जिल्ह्यात खासदार रक्षा खडसे चक्काजाम आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. यावेळी त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संतोष सोनवणे यांनी..

मॅक्स वुमनला दिलेल्या प्रतिक्रीयेत रक्षा खडसे म्हणाल्या की, "ओबीसी आरक्षण राज्यसरकारच देऊ शकतं. केंद्रांवर जबाबदारी झटकून ठाकरे सरकार पळ काढतंय. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्याचा जो विषय आहे त्याचा अधिकार घटनेने राज्य सरकारांना दिला आहे. म्हणजेच तो महाराष्ट्र सरकारला देखील आहे. महाराष्ट्र सरकारने न्यायालयात वेळेवर पुरावे दिले नाहीत त्यामुळे हे आरक्षण रद्द झालंय." असा आरोप खासदार रक्षा खडसे यांनी केला आहे.

दरम्यान, दरम्यान, ओबीसी आरक्षणासाठी आज भाजपाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात १ हजार ठिकाणी जेलभरो आंदोलनाला सुरुवात झाली आहे. राज्यभरातील सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, बीड, नागपूर, चंद्रपूर, औरंगाबाद, ठाणे, नाशिक, मुंबईसह अनेक जिल्ह्यांमधे सध्या भाजपाने चक्काजाम आंदोलनाला सुरुवात केली आहे.

Updated : 26 Jun 2021 2:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top