Home > Political > MP Election 2023: चित्रकुट मधून प्रियंका गांधीचां मोदी, चौहानावर निशाणा

MP Election 2023: चित्रकुट मधून प्रियंका गांधीचां मोदी, चौहानावर निशाणा

मध्यप्रदेशात मतदानाच्या आधी भाजप आणि कॉग्रसचे नेते आपली ताकद लावत आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सतना, छतरपुर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या चंदेरी आणि अशोकनगर च्या दौऱ्यावर आहेत तर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी हे जबलपुर मध्ये रोड शो करणार आहेत.

MP Election 2023: चित्रकुट मधून प्रियंका गांधीचां  मोदी, चौहानावर निशाणा
X

प्रियांका गांधी यांचा भाजपवर निशाणा

प्रियांका गांधी आज चित्रकूट दौऱ्यावर आहेत. काँग्रेसचे उमेदवार निलांशु चतुर्वेदी यांच्या समर्थनार्थ त्यांनी येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. पतप्रधान मोदींवर निशाणा साधत प्रियंका गांधी म्हणाल्या की, "जुने संसद भवन वापरात होते, मोदींनी त्याच्या सुशोभिकरणावर 20 हजार कोटी रुपये खर्च केले, पण थकबाकीचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाहीत. मोदीजी म्हणतात की काँग्रेसने 70 वर्षात काहीही केले नाही, मग मोदीजी आपल्या उद्योगपती मित्रांना काय देत आहेत. 1200 आणि 1400 रुपयांना सिलिंडर मिळत असल्याची माहिती कोणी मोदीजींना देईल का? लोक शिवराजला एक प्रॉब्लेम असल्याचं सांगतात तेव्हा शिवराज म्हणतो की मी तुझा मामा आहे, काळजी करू नकोस. शेतकऱ्याला युरिया मिळत नाही, तो काका म्हणतो. परीक्षांमध्ये घोटाळे होत आहेत. रोजगार यादी उपलब्ध नाही. भरती घोटाळ्यामुळे तरुणांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. राज्यात दररोज १७ महिलांचे शोषण होत आहे, परंतू सुरक्षा दिली जात नाही. मामा सुरक्षा देऊ शकले असते. अत्याचारावर अत्याचार होत आहेत, तुम्ही मामा म्हणता. नाती जपूनच नाती निर्माण होतात नाहीतर कंस पण मामा होता. प्रचारसभेला संबोधित करताना प्रियांका म्हणाल्या

गेल्या १८ वर्षांपासून मध्यप्रदेशात भाजपचे सरकार आहे. पण तरीही कुपोषण, बेरोजगारी, गरिबी, भटक्या जनावरांची समस्या आहे. अखेर भाजप सरकारने गेल्या 18 वर्षांत या समस्या सोडवण्यासाठी काय केले? असा थेट सवाल प्रियांका गांधींनी भाजपला तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलाय. आपण आपल्या मुलांना टोकतो चूक केल्यावर तसंच जर राजकारणी मंत्री चूक करतायत तर आपण त्यांना देखील चुकीला टोकले पाहिजे असे प्रियांका गांधी यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं आहे.

Updated : 9 Nov 2023 3:15 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top