भारती ताई तुम्ही चुकलात....
X
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकानी कार्यक्रमात आयोजीत करण्यार आले होते. या कार्यक्रमांना अनेक ठिकानी लोकांची गर्दी पाहायला मिळाली. अशाच प्रकारचा एक कार्यक्रम केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री भरती पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. पण यावेळी या केंदीय मंत्र्यांनाच आपण कोरोना संदर्भात केलेल्या आव्हानांचा विसर पडल्याचे दिसले. एवढ्या तोबा गर्दीत ना कोणाच्या तोंडाला मास्क आहे ना कोणी इथे कोरोना संदर्भात आखलेल्या नियमांचे पालन करत होत. स्वतः भरती पवार यांच्या तोंडावरचा मास्क खाली घसरला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सिडको मंडल येथिल शिवाजी नाना भरके अटल सेवा जनक जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा केंद्रित राज्य आरोग्यमंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. त्या वेळी महिलांसाठी लकी ड्रॉ स्पर्धा घेऊन बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात लहान बालकांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मात्र यावेळी तुफान गर्दी पाहायला मिळाली. भारती पवारांचा मास्क अर्धवट लावेलेला तर होताच पण आजूबाजूला उभा असलेल्या लोकांना मास्क सुद्धा नव्हता. एकीकडे दुसरी लाटेत काळजी घेण्याचे आव्हान केंद्र सरकार करत आहे, खुद्द भारती पवार रोज वेगवेगळ्या कार्यक्रमांना, बैठकींना हजेरी लावून याबाबत लोकांना आवाहन करत आहे. मात्र नियम पाळायची वेळ आल्यावर तोडण्यासाठी सुद्धा सर्वात आधी दिसत असल्याने भारती ताई तुम्ही चुकलात अशी म्हणण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे.