Home > Political > मोदीजींनी संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केला - मंत्री यशोमती ठाकूर

मोदीजींनी संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केला - मंत्री यशोमती ठाकूर

मोदीजींनी संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केला -  मंत्री यशोमती ठाकूर
X

देहूमध्ये काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात बोलले. मात्र, तिथे अजित पवारांना बोलण्याची संधी मिळाली नाही. हा सगळा प्रकार घडल्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीकडून या संपूर्ण प्रकारावर टीका केली जात आहे. आता काँग्रेसने देखील यात उडी घेतली आहे. महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकुर यांनी अमरावतीत यावर संतप्त व आक्रमक भूमिका मांडली. या देशात संविधान आहे की नाही असा थेट सवालच त्यांनी उपस्थित केला, प्रोटोकॉल नुसार अजित पवारांना बोलू द्यायला पाहिजे होते पन तस झाले नाही, प्रत्येक गोष्टीत केंद्र सरकार राजकारणात करत हे अजिबात शोभणार नाही हे चिल्लरगिरी आहे. भारताच्या संस्कृतीला न पटणारे आहे. मोदींनी अजीत पवारांचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अवमान केला, भाजपने देशाचे वातावरण खराब केले अशी टीका यशोमती ठाकुर यांनी भाजपवर केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्यापासून डावलल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे चांगल्याच संतापल्या होत्या त्या म्हणाल्या की, अजित पवारांच्या कार्यालयाने पीएम ऑफिसला विनंती केली होती की, अजित पवारांना भाषण करायचे आहे. दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, पीएम कार्यालयाने अजित पवारांच्या भाषणाला परवागणी दिली नाही, असा अतिशय गंभीर आरोप त्यांनी केला आहे.


Updated : 15 Jun 2022 11:13 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top