‘आता तुमचा चष्मा पक्षातील इतर नेत्यांनाही द्या’, रोहित पवारांचा पंकजा मुंडेंना सल्ला
X
कोरोना महामारीच्या जागतिक (Covid 19) संकटात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) चांगल्या रितीने कारभार सांभाळत असल्याची पावती भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली होती. संकटाच्या काळात राजकारण विसरुन सकारात्मक बोलण्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पंकजा मुंडें चे (Pankaja Munde) आभार मानले आहेत.
- पंकजा मुंडे म्हणतात फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीत ‘हे’ आहे अंतर
- ‘हे कामगार आक्रमक झाले तर प्रशासनालाही अवघड जाईल’, पंकजा मुंडेंची सुचना
- कोरोनाबाबत पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं.. फक्त एका क्लिकवर
मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक करताना पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांचं वेगळं राहणीमान आणि कार्यपद्धतीविषयी आपली भावना व्यक्त करताना ते नवा पायंडा घालतील अशी आशा व्यक्त केली होती. यावर रोहित पवार यांनी पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहेत.
.@Pankajamunde ताई @OfficeofUT साहेब चांगलंच काम करतायेत आणि संकटाच्या काळात राजकारण न करता तुम्ही त्यांच्याबद्दल चार शब्द सकारात्मक बोललात याबाबत आपले आभार. https://t.co/EyLXItpRNu
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 10, 2020
दरम्यान, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. म्हणून “आता तुमचा चष्मा तुमच्या पक्षातील इतर नेत्यांनाही दिला तर चांगला कारभार चालत असताना करायची म्हणून ते टिका करणार नाहीत.” असा टोला लगावण्याची संधीही रोहित पवार यांनी सोडली नाही.
आता तुमचा चष्मा तुमच्या पक्षातील इतर नेत्यांनाही दिला तर चांगला कारभार चालत असताना करायची म्हणून ते टिका करणार नाहीत.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 10, 2020