Home > Political > ST Worker Protest : ''हल्ला सुनियोजित..हे केवळ सत्तेवर येण्यासाठी" मंत्री ठाकूर यांचा भाजपवर आरोप

ST Worker Protest : ''हल्ला सुनियोजित..हे केवळ सत्तेवर येण्यासाठी" मंत्री ठाकूर यांचा भाजपवर आरोप

क्लीयर-क्लीयर दिसत आहे. भाजप एसटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वतःची राजकीय पोळी शेकायचं काम करत आहेत. शरद पवार यांच्या घरावरील हल्ला सुनियोजित आल्याचा मंत्री. यशोमती ठाकूर यांचा आरोप..

ST Worker Protest : हल्ला सुनियोजित..हे केवळ सत्तेवर येण्यासाठी मंत्री ठाकूर यांचा भाजपवर आरोप
X

उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटेल, अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाच एसटी कर्मचाऱ्यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर चपला फेकल्या. काल घडलेल्या या प्रकारावरून महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी भाजप एसटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वतःची राजकीय पोळी शेकायचं काम करत आहेत. जो हल्ला केला तो सुनियोजित होता. याच्यामागे नक्कीच भाजपची मंडळी असल्याचे म्हंटल आहे.

एसटी (st workers) कर्मचाऱ्यांचे आंदोलन संपतय की काय असे वाटत असतानाच एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक झाले आहेत. काल एस.टी कर्मचाऱ्यांनी महाविकास आघाडीचे जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या मुंबईमधील सिल्वर ओक (silver oak) या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. काल घडलेल्या या प्रकारामुळे आता राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिकिया येत आहेत. कालचा हा हल्ला सुनियोजित होता व याच्यामागे नक्कीच भाजपची मंडळी आहेत. भाजप राष्ट्रपती राजवट किंवा ज्या इतर गोष्टी बोलत आहे ते केवळ सत्तेवर येण्यासाठी करत असल्याचा आरोप मंत्री ठाकूर यांनी केला आहे.

मंत्री यशोमती ठाकूर यांनी काय म्हंटल आहे..

महाराष्ट्राने जे बघितलं ते धक्कादायक आहे. शरद पवार हिमालयाच्या उंची एवढा मोठा नेता आहे. क्लीयर-क्लीयर दिसत आहे भाजप एसटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वतःची राजकीय पोळी शेकायचं काम करत आहेत. जो हल्ला केला तो सुनियोजित होता. याच्यामागे नक्कीच भाजपची मंडळी आहेत. भाजप राष्ट्रपती राजवट किंवा ज्या इतर गोष्टी बोलत आहे ते केवळ सत्तेवर येण्यासाठी करत आहे. महाराष्ट्र अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण करणाऱ्यांना कधीच माफ करणार नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्याप्रति महाविकास आघाडी सरकारला सहानुभूती नक्कीच आहे. तुम्ही कितीही राजकीय हल्ले आमच्यावर करत असाला तरी महाविकास आघाडी आजही आहे आणि उद्याही राहणार..

Updated : 9 April 2022 10:04 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top