भाजपकडून मेधा कुलकर्णी यांना राज्यसभा उमेदवारी.
भाजपने महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. यात अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांचा समावेश आहे. मेधा कुलकर्णी यांच्या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होती आणि आता त्यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे..
X
पुण्यातील चांदणी चौकाच्या पुलावरुन पुण्यातील भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई पहायला मिळाली होती. त्यावेळी मेधा कुलकर्णी यांच नाव चर्चेत होत.कुलकर्णी यांनी त्यांना कार्यक्रमाच्या तयारीत डावलण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यावेळी नितिन गडकरी त्यांच्या घरी गेले असतानाही त्या नाराज असल्याचं बघायला मिळालं होतं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सामंजसपणाने काम करण्याचा सल्ला सगळ्या भाजपच्या नेत्यांना दिला होता. पण मेधा कुलकर्णींच्या नावाची चर्चा होतच राहिली.
भाजपने महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. यात अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांचा समावेश आहे. मेधा कुलकर्णी यांच्या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होती आणि आता त्यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे..
मेधा कुलकर्णी कोण आहेत?
मेधा कुलकर्णी पुण्यातील मानवंत महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या. त्यानंतर त्या पुणे महापालिकेत कोथरुडच्या नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. 2014 मध्ये त्यांना भाजपकडून कोथरुड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आणि त्या 70 हजार मताधिक्याने जिंकल्या. 2019 मध्ये चंद्रकांत पाटील यांना विधानसभेवर निवडून आणण्यासाठी मेधा कुलकर्णी यांच्या उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर मेधा कुलकर्णी भाजपवर नाराज असल्याची चर्चा रंगली. त्यांनी अनेकदा भाजपच्या नेत्यांपेक्षा वेगळी भूमिका घेतली आणि पुण्यातील टेकड्या आणि इतर विषयांवर उघडपणे मतं मांडली आहेत.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत ब्राह्मण उमेदवाराला भाजपकडून तिकिट देण्यात न आल्याने भाजपवर ब्राह्मण समाज नाराज होऊ शकतो अशी चर्चा होती. त्यामुळे मेधा कुलकर्णींना राज्यसभेची उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे. यातून आता पुन्हा एकदा विधानसभेची जागा चंद्रकांत पाटलांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची चर्चा चालू आहे.