पंतप्रधानांचा पुणे दौरा रस्ता रोकोसाठी मराठा समाजाचे नियोजन सुरु
X
पुणे दौऱ्यावर येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मार्ग मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने अडवण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. या संदर्भात आम्ही मराठा मोर्चाच्या नेत्या स्वाती नखाते-पाटील यांच्याशी बोललो असता त्या म्हणाल्या की, "एवढे मोर्चे आंदोलनं करुनही मराठ्यांना भरती प्रक्रियेतून वगळण्यात आलं. त्यात आता देशाचे पंतप्रधान येणार असतील तर त्यांना प्रश्न विचारण्याचा युवकांना नक्कीच अधिकार आहे. त्यामुळे होइल त्या माध्यमातून पंतप्रधानांपर्यंत पोहोचण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न असेल." असं म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 28 नोव्हेंबरला पुण्यात येणार आहेत. त्याच दिवशी ते सिरम इन्स्टिट्यूला भेट देणार आहेत. दुपारी 1 ते 2 या दरम्यान मोदी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लसीच्या निर्मितीबाबत माहिती घेतील. त्यानंतर 4 डिसेंबरला 100 देशांचे राजदूत सिरम इन्स्टिट्यूट आणि हिंजवडीतील जिनेव्हा बायोटेक कंपनीला भेट देणार आहेत.
दरम्यान, या रस्तारोकोचं सध्या नियोजन सुरु असून लवकरच त्याबाबत माहिती देण्यात येणार असल्याचंही स्वाती नखाते यांनी सांगीतलं आहे.