मुख्यमंत्री राजीनामा देणार होते पण शरद पवारांनी..
X
राज्यातील सत्तेचा संघर्ष आता थेट सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. बंडखोर आमदारांना आणि शिवसेनेलाही १२ जुलैपर्यंत मुदत मिळाली आहे. पण इकडे राज्याच्या राजकारणासाठी पुढचे २ दिवस महत्वाचे ठरणार आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे पुढील दोन दिवसात राज्य सरकारला बहुतम सिद्ध कऱण्याचे आदेश देऊ शकतात, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गट लवकरच राज्यात परतणार आहे, असेही समजते आहे.
दुसरीकडे सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २१ जून रोजीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनाम्याची तयारी केली होती, पण शरद पवार यांनी त्यांना राजीनामा देऊ म्हणून त्यांचे मन वळवल्याचीही माहिती मिळते आहे. एवढेच नाही तर २२ जून रोजीदेखील मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर आभारासाठी सचिवांची बैठक बोलावली होती. आली होती. पण पुन्हा शरद पवार यांनी राजानीमा देऊ नका, असे सांगितल्याचे सुत्रांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे गट कोणत्याही पक्षात विलिन होणार नाहीये, तर त्यांचे स्वतंत्र अस्तित्व असेल आणि येत्या दोन दिवसात राज्यपाल सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देऊ शकतात, असेही सुत्रांनी सांगितले आहे.